रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून वाशिम स्थानकाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 02:48 PM2019-09-14T14:48:52+5:302019-09-14T14:49:03+5:30
दक्षिण मध्यरेल्वेचे जनरल मॅनेजर मल्ल्या याचा विदर्भ मराठवाडयातील हा पहीलाच सर्वेक्षण दोैरा होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: दक्षिण मध्ये रेल्वेचे जनरल मॅनेजर गजानन मल्ल्या यांनी गुरुवार १२ सप्टैंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास स्थानिक रेल्वेस्थानकाला भेट देवून रेल्वेस्थानकाची पाहणी केली. तसेच येथील समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी मल्ल्या यांच्या सोबत दक्षिण मध्यरेल्वेचे सेक्रेटरी निलकंठ रेड्डी व नांदेड रेल्वे अप्पर विभागीय व्यवस्थापन नाग भुषण हे उपस्थित होते.
दक्षिण मध्यरेल्वेचे जनरल मॅनेजर मल्ल्या याचा विदर्भ मराठवाडयातील हा पहीलाच सर्वेक्षण दोैरा होता. दुपारी त्यांचे वाशिम स्थानकावर आगमन होताच स्टेशनमास्तर महेंद्र उजवे चिफ कमर्शियल इन्स्पेक्टर प्रविण पवार,मुख्यइंजीनिअर रमेश रेड्डी, मुख्यदूरसंचार अभियंता लक्ष्मण, गुडस् सुपरवायझर वर्मा, नांदेड रेल्वेचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त सी.पी. मिर्धा, नांदेड रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे, अकोला रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक सुधीर कुमार, वाशिम रेल्वेस्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक उत्तम शिनगारे, गुरुमुखसिंग गुलाटी, आदींनी त्यांचे बुके देवून स्वागत केले. या नंतर मल्या यांनी वाशिम रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म, स्थानिक परिसर स्टेशनमास्तर रुम, तिकीट कार्यालय, पार्कींग, पादचारी पुल, तसेच स्टेशनची स्वच्छता आदी बाबत निरीक्षण करून प्रवासी सुविधांचे निरीक्षण केले.
विविध संघटनांचे निवेदन
दक्षिण मध्यरेल्वेचे मॅनेजर मल्ल्या यांना शहरातील व्यापारी युवा मंडळ, तरणसेठी तिरुपती मित्र मंडळ व अॅटोचालक संघटना यांच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात अकोला खंडवा ब्रॉडगेज मार्ग त्वरित निर्माण करण्यात यावा नांदेड गंगानगर सचखंड व तिरुपती या एक्सप्रेस गाडयांचा थांबा दोन मिनीटांनी वाढविण्यात यावा जेणे करून भाविकांना खिचडीचे प्रसादाचे वाटप करणे सोयीचे होईल. गंगानगर , जयपूर, बिकाणेर, आदी सर्व एक्सप्रेस गाडयांना शेगाव स्टेशनवर थांबा द्यावा हैद्राबाद ते इंदौर व नागपूर ते औरंगाबाद या मार्गावर नवीन डेली इंटरसिटी सुरु करावी तसेच साप्ताहीक धावणाºया नागपूर कोल्हापूर अमरावती पुणे, अजली मुंबई, या रेल्वेगाडया दररोज सुरु करण्यात याव्या आदी मागण्याच्या समावेश केला आहे. तर आटोसंघटनेच्यावतीने आॅटोस्टॉपसाठी वेगळी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच रेल्वे स्थानकावर येणाºयाव बाहेरगावी जाणाºया जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना घेण्यासाठी व सोडण्यासाठी स्टेशनच्या आत येणाºया अॅटोचालकांना पार्कींगचा भुंर्दड पडू नये अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देणाºयामध्ये गुरुमुखसिंग गुलाटी यांच्यासह व्यापारी युवा मंडळाचे अध्यक्ष आनंद चरखा, भरज चंदनानी, बॉबी गुलाटी, गोविंद वर्मा, शैलेश गेलडा, विजय गोधा, तरणसेठी तिरुपती मित्रमंडळाचे उज्वल देशमुख, तरणसिंग सेठी, पप्पु माळोदे, डॉ.दिनकर गर्जे, नथ्थु दंबीवाल, सुभाष देशमुख, तसेच अॅटोसंघटनेचे मनिष डांगे, वसीम सैय्यद, अब्दुल रउफ, व शे. मुसार आदींचा समावेश होता.