रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट ३० रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:26 AM2021-06-21T04:26:27+5:302021-06-21T04:26:27+5:30
वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने आता रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट वाशिम येथे पुन्हा ...
वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने आता रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट वाशिम येथे पुन्हा ३० रुपये करण्यात आले आहेत. दुसरीकडे कोरोनाकाळात वाशिममार्गे धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वे बंदच असल्याने वाशिम येथे प्लॅटफॉर्म तिकीटही बंद ठेवण्यात आले आहे.
दुसऱ्या टप्प्यात मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने निर्बंध कडक करण्यात आले. त्यामुळे प्रवासावरही मर्यादा आल्या. वाशिममार्गे तीन पॅसेंजर आणि काही विशेष रेल्वेगाड्या धावतात. दुसऱ्या लाटेत जवळपास तीन महिने रेल्वे सेवा प्रभावित होती. अनलॉकच्या टप्प्यात आता रेल्वे सेवा पूर्ववत झाली आहे. दुसरीकडे पॅसेंजर रेल्वे अद्यापही बंदच आहेत. एक्स्प्रेस रेल्वे प्रवासाला प्रवाशांचा हळूहळू प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. सध्या वाशिममार्गे काचीगुडा-नरखेड ही इंटरसिटी एक्स्प्रेस तसेच तिरुपती-अमरावती, जयपूर-हैैदराबाद, जयपूर-सिकंदराबाद या चार रेल्वे गाड्यांच्या आठ फेऱ्या सुरू आहेत. मध्यंतरी प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये झाले होते. आता वाशिम येथे ३० रुपये आहे. पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने प्लॅटफॉर्म तिकीटही बंद ठेवण्यात आले आहे.
००००००
स्थानकातून दररोज जाणाऱ्या रेल्वे ८
रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या ३६५
०००
प्लॅटफॉर्म तिकिटातून कमाई
२०१९ २४००
२०२० २१०
२०२१(मेपर्यंत) १५०
००००
पॅसेंजर बंदमुळे प्लॅटफॉर्म तिकीटही बंद!
सध्या वाशिममार्गे एक्स्प्रेस रेल्वे सुरू आहेत. कोरोनाकाळात वाशिम रेल्वे स्थानकावर फारशी गर्दी नाही. पॅसेंजरही बंद असल्याने प्रवासी संख्या घटली आहे. पॅसेंजर सुरू झाल्यानंतर प्लॅटफॉर्म तिकीटही सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसारच सध्या प्लॅटफॉर्म तिकीट बंद ठेवण्यात आले आहे.
०००००
प्रवासी संख्या हळूहळू वाढतेय
अनलॉकच्या टप्प्यात प्रवासावरील निर्बंध हटले आहेत. वाशिममार्गे काही एक्सप्रेस रेल्वे धावतात. त्यामुळे प्रवासी संख्या हळूहळू वाढत असल्याचे दिसून येते. काचीगुडा-नरखेड या इंटरसिटी एक्स्प्रेसला प्रवाशांची पसंती मिळत असल्याचे दिसून येते.
००००००
कोट
गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे रेल्वे सेवाही प्रभावित झाली होती. पहिली लाट ओसरल्यामुळे काही काळासाठी रेल्वे सेवा पुन्हा पूर्ववत झाली. परंतु, त्यानंतर अल्पावधीतच कोरोनाची दुसरी लाट आली. दुसऱ्या लाटेत जवळपास तीन महिने रेल्वे सेवा पुन्हा प्रभावित झाली. अनलॉकच्या टप्प्यात वाशिममार्गे काही एक्स्प्रेस रेल्वे धावत आहेत. हळूहळू प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे.
- एम.टी. उजवे
स्टेशन मास्तर, वाशिम