पंजाबकडे धावणार्‍या रेल्वे रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 01:13 AM2017-08-28T01:13:51+5:302017-08-28T01:14:01+5:30

वाशिम: डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम  यांच्यावरील शिक्षेची सुनावणी सोमवारी होत असून या पृष्ठभूमीवर वाशिममार्गे पंजाबकडे जाणार्‍या सर्व रेल्वे रद्द करण्याचा निर्णय दक्षिण-मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 

Railway run to Punjab cancels! | पंजाबकडे धावणार्‍या रेल्वे रद्द!

पंजाबकडे धावणार्‍या रेल्वे रद्द!

Next
ठळक मुद्देप्रवाशांची धांदलडेरा सच्चा सौदाच्या आंदोलनाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम  यांच्यावरील शिक्षेची सुनावणी सोमवारी होत असून या पृष्ठभूमीवर वाशिममार्गे पंजाबकडे जाणार्‍या सर्व रेल्वे रद्द करण्याचा निर्णय दक्षिण-मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना न्यायालयाने दोषी ठरवताच हरयाणात हिंसाचार उफाळला. दिल्ली, पंजाब, हरयाणा राज्यात काही ठिकाणी रेल्वेचा रुळही उखडण्यात आले. या घटनेत रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. या पृष्ठभूमिवर प्रवाशांची सुरक्षितता आणि संभाव्य धोका लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने नांदेडवरून वाशिम, अकोलामार्गे पंजाब, हरयाणाकडे जाणार्‍या रेल्वे रद्द केल्या आहेत. त्यानुसार, २७ ऑगस्ट रोजी नियोजित १२७१६ या क्रमांकाची अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. या रेल्वेने जवळपास एक हजार प्रवासी प्रवास करणार होते. सोमवार, २८ ऑगस्ट रोजी धावणारी १२४८५ या क्रमांकाची हुजूर साहेब नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे.  आसन आरक्षित करणार्‍या सर्व प्रवाशांना तिकीटाच्या रकमेचा शंभर टक्के टक्के परतावा केला जाईल, अशी माहीती दिला जाणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी दिली. 

Web Title: Railway run to Punjab cancels!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.