पावसामुळे क्षतिग्रस्त पूल ‘जैसे-थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:51 AM2021-07-07T04:51:48+5:302021-07-07T04:51:48+5:30
------------ रस्त्यावरील पूल धोकादायक वाशिम: रिसोड तालुक्यातील रिसोड ते गोभणी या दोन गावांदरम्यान असलेल्या रस्त्यात पैनगंगा नदीपात्रात पुलाची उभारणी ...
------------
रस्त्यावरील पूल धोकादायक
वाशिम: रिसोड तालुक्यातील रिसोड ते गोभणी या दोन गावांदरम्यान असलेल्या रस्त्यात पैनगंगा नदीपात्रात पुलाची उभारणी काही वर्षांपूर्वी करण्यात आली. या पुलाची उंची कमी असून, पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे एखाद्वेळी येथे अपघात घडण्याची भीती आहे.
-----
खंडित वीजपुरवठ्याला ग्रामस्थ वैतागले
वाशिम: कारंजा तालुक्यातील धोत्रा देशमुख येथे गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने येथील गावकरी वैतागले आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी गावकऱ्यांनी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना निवेदन देऊनही समस्या कायम आहे.
---------
मुख्य चौकात लोंबकळत्या तारा
वाशिम: शिरपूर जैन येथील बसस्थानक परिसरात मुख्य चौकात वर्दळीच्या ठिकाणी महावितरण कंपनीच्या गार्डिंग नसलेल्या वीजतारा लोंबकळत्या स्थितीत आहेत. या तारा तुटल्यास अपघात घडण्याची भीती आहे. त्यामुळे या वीजतारा सुरळीत करण्याची मागणी होेत आहे.
^^^^^^^^^^^^^^