अवकाळी पावसाचा तुरीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 05:34 PM2018-11-20T17:34:34+5:302018-11-20T17:34:52+5:30
वाशिम : जिह्यात काही ठिकाणी १९ नोव्हेंबर रोजी रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे तुरीच्या पिकाचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे तुरीचा फुलोरा झडल्याने या पिकाच्या उत्पादनात घट देणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिह्यात काही ठिकाणी १९ नोव्हेंबर रोजी रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे तुरीच्या पिकाचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे तुरीचा फुलोरा झडल्याने या पिकाच्या उत्पादनात घट देणार आहे.
गेल्या तीन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण असताना तुरीचा फुलोरा गळण्यास सुरुवात झाली होती आणि पिकावर अळ्यांचा प्रादूर्भावही वाढू लागला होता. त्यातच वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी सोमवार १९ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा अवकाळी पाऊस पडला. जिल्ह्यात या दिवशी २.४६ मि.मी. पावसाची नोंदही करण्यात आली. या पावसामुळे फुलावर आलेल्या तुरीच्या पिकाला मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी तुरीचा निम्म्याहून अधिक फुलोरा गळून पडला. यामुळे तुरीच्या उत्पादनात काही प्रमाणात घट येणार असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, जिल्ह्यात मंगळवार २० नोव्हेंबरपर्यंत ढगाळ वातावरण असल्याने तुरीचे पीक अद्यापही धोक्यातच आहे. या वातावरणामुळे पिकांवर अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव वाढणार असून, फुलोºयाची गळतीही होणार असल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
सोयाबीन कुटार, कपाशीचेही नुकसान
जिल्ह्यात विविध ठिकाणी सोमवारी मध्यरात्री आलेल्या पावसामुळे तुरीच्या पिकासह शेतकºयांनी शेतात सोयाबीन काढून ठेवलेले कुटारही भिजले आहे. कुटार भिजल्यामुळे कुजून गुरांच्या चाºयाचा प्रश्न शेतकºयांसमोर उपस्थित होणार आहे. त्याशिवाय दुसºया, तिसºया वेचणी आलेल्या कपाशीची फुललेली बोंडेही या पावसामुळे भिजल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे.