पानी फाउंडेशनच्या मिनी स्पर्धेतील विजेत्या गावांना पर्जन्यमापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:28 AM2021-07-16T04:28:28+5:302021-07-16T04:28:28+5:30

पानी फाउंडेशनकडून समृद्ध गाव स्पर्धेत घेण्यात आलेल्या मिनी स्पर्धेत २४ पैकी १४ गावांनी ७० पेक्षा अधिक गुण मिळवले. ...

Rain gauges to the winning villages in the Pani Foundation's mini competition | पानी फाउंडेशनच्या मिनी स्पर्धेतील विजेत्या गावांना पर्जन्यमापक

पानी फाउंडेशनच्या मिनी स्पर्धेतील विजेत्या गावांना पर्जन्यमापक

Next

पानी फाउंडेशनकडून समृद्ध गाव स्पर्धेत घेण्यात आलेल्या मिनी स्पर्धेत २४ पैकी १४ गावांनी ७० पेक्षा अधिक गुण मिळवले. विजेत्या गावांना पर्जन्यमापक यंत्र देण्यासाठी ३० जून २०२१ला जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. व पानी फाउंडेशनचे राज्य समन्वयक डॉ. अविनाश पोळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गायवळ गावचे कृषी सहायक मंगेश सोळंके यांच्याकडे प्रदान करण्यात आली. गुरुवारी पर्जन्यमापक गायवळ येथे गावकऱ्यांच्या सुपूर्द करण्यात आले. नियमित पावसाची नोंद घेणे व रजिस्टर अद्ययावत ठेवणे याची जबाबदारी ग्रामपंचायत कर्मचारी बंडूभाऊ इंगळे यांनी स्वीकारली आहे. कार्यक्रमाला गावचे कार्यकारी सरपंच सतीश राऊत, ग्रा. प. सचिव राठोड म.कृ.अ. चौधरी, कृषी पर्यवेक्षक तथा नोडल अधिकारी ढोकने, कृषी सहायक सोळंके, ग्रा. पं. सदस्य विष्णू लोखंडे, दिनेश गायकवाड, गौरव भगत, बाळकृष्ण व्यवहारे,रोजगार सेवक गायकवाड तसेच पानी फाउंडेशन तालुका समन्वयक रवींद्र लोखंडे उपस्थित होते.

------

गावांनी मिळविले ७० पेक्षा अधिक गुण

पानी फाउंडेशनकडून समृद्ध गाव स्पर्धेत घेण्यात आलेल्या मिनी स्पर्धेत कारंजा लाड तालुक्यातील २४ गावे सहभागी झाली होती. १२० गुणाच्या या स्पर्धेत ७० पेक्षा अधिक गुण घेणारी गावे सन्मानास पात्र ठरली आहे. या मिनी स्पर्धेत २४ पैकी १४ गावांनी ७० पेक्षा अधिक गुण मिळविले.

Web Title: Rain gauges to the winning villages in the Pani Foundation's mini competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.