पावसाची विश्रांती; शेतकरी चिंतातूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:27 AM2021-06-28T04:27:38+5:302021-06-28T04:27:38+5:30

गतवर्षातील नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून स्वत:ला सावरत यंदा शेतकरी हे खरीप हंगामासाठी नव्या जोमाने कामाला लागले. यंदा जिल्ह्यात ४ लाख ...

Rain rest; Farmers worried! | पावसाची विश्रांती; शेतकरी चिंतातूर !

पावसाची विश्रांती; शेतकरी चिंतातूर !

Next

गतवर्षातील नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून स्वत:ला सावरत यंदा शेतकरी हे खरीप हंगामासाठी नव्या जोमाने कामाला लागले. यंदा जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ४५० हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन असून, सर्वाधिक पेरणी ही सोयाबीनची होणार आहे. आतापर्यंंत जवळपास ६७ टक्के पेरणी आटोपली आहे. गत आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस नसल्याने हलक्या जमिनीतील पिके कोमेजून जात आहेत. मंगरूळपीर, रिसोड, मानोरा तालुक्यातील काही भागात पाऊस झाला तर वाशिम, कारंजा तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. रविवारी गत २४ तासात जिल्ह्यात सरासरी ५.८ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली. सर्वाधिक मंगरूळपीर तालुक्यात २३.७ मि.मी. झाला. वाशिम तालुक्यात १.२ मि.मी. रिसोड तालुक्यात ०.४, मानोरा तालुक्यात ९.३ तर कारंजा तालुक्यात ३.८ मि.मी. पाऊस झाला. मालेगाव तालुक्यात पाऊस झाला नसल्याची नोंद आहे. बिजांकुर जमिनीबाहेर आले असून, पिकांना सध्या पावसाची नितांत गरज आहे. वाशिम व कारंजा तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

०००

बॉक्स

आतापर्यंत झालेला एकूण पाऊस

तालुका पाऊस (मि.मी.)

वाशिम १८४

रिसोड २२५

मालेगाव २०४

मंगरूळपीर २४२

मानोरा २५७

कारंजा १३७

००००

कोट बॉक्स

दहा दिवसांपूर्वी सर्व पेरणी आटोपली आहे. आता पाऊस नसल्याने पिके कोमेजून जात आहेत. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचे सावट आहे.

- पांडुरंग सोळंके,

शेतकरी, नागठाणा, ता.वाशिम

०००

गतवर्षीच्या नैसर्गिक संकटातून सावरत यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पेरणी केली. ९० टक्के पेरणी आटोपली आहे. आता पाऊस नसल्याने चिंता वाढली आहे.

- हरिश चौधरी

शेतकरी, पार्डीटकमोर ता.वाशिम

००००

Web Title: Rain rest; Farmers worried!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.