Rain: वाशिम जिल्ह्यात परतीच्या पावसाचे तांडव; सहा मंडळात अतिवृष्टी
By दादाराव गायकवाड | Published: October 6, 2022 02:31 PM2022-10-06T14:31:36+5:302022-10-06T14:31:56+5:30
Rain: वाशिम जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून परतीच्या पावसाने तांडव घातले. अनेक भागांत रात्रभर धो-धो पाऊस कोसळला कोसळला. हवामान खात्याच्या अहवालानुसार जिल्ह्यात बुधवार ५ ऑक्टोबरच्या सकाळपासून ते गुरुवार ६ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंतच्या २४ तासांत सहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
- दादाराव गायकवाड
वाशिम - जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून परतीच्या पावसाने तांडव घातले. अनेक भागांत रात्रभर धो-धो पाऊस कोसळला कोसळला. हवामान खात्याच्या अहवालानुसार जिल्ह्यात बुधवार ५ ऑक्टोबरच्या सकाळपासून ते गुरुवार ६ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंतच्या २४ तासांत सहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात मंगरुळपीर आणि वाशिम तालुक्यातील प्रत्येकी तीन मंडळांचा समावेश आहे. जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ७८९.०० मि.मी. पाऊस अपेक्षीत असताना या कालावधित ८४५.९० मि.मी. पावसाची नोंद झाली. अर्थात पावसाळ्याच्या दिवसांत सरासरीपेक्षा ७ टक्के अधिक पाऊस पडला. त्यानंतर आता परतीच्या पावसाने जिल्ह्यात तांडव घालण्यास सुरुवात केली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यापासून परतीच्या पावसाचा जोर जिल्ह्यात वाढत आहे. त्यात बुधवार ५ ऑक्टोबरच्या सकाळपासून ते गुरुवार ६ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंतच्या २४ तासांत मंगरुळपीर, मानोरा, कारंजा आणि वाशिम या चार तालुक्यात धो-धो पाऊस कोसळल्याने वाशिम आणि मंगरुळपीर तालुक्यातील प्रत्येकी ३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर, राजगाव आणि केकत उमरा, तर मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव, पोटी आणि धानोरा महसूल मंडळाचा समावेश आहे.
हजारो हेक्टरमधील सोयाबीनला फटका
जिलह्यात बुधवार आणि गुरुवारदरम्यानच्या २४ तासांत पडलेल्या जोरदार पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीनसह इतर पिकांना फटका बसला. त्यामुळे शेतकरी पुन्हा हवालदील झाला आहे. या पीक नुकसानाचे पंचनामे करून शासनाकडून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
मालेगाव, रिसोड तालुक्यात प्रमाण कमी
वाशिम जिल्ह्यात त बुधवारी रात्रीपासून अनेक भागांत रात्रभर धो-धो पाऊस कोसळला कोसळला. त्यात मंगरुळपीर, मानोरा, कारंजा आणि वाशिम तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक होते. त्या तुलनेत रिसोड आणि मालेगाव तालुक्यात मात्र पावसाचे प्रमाण थोडे कमी होते.
या मंडळात झाली अतिवृष्टी
मंडळ - पडलेला पाऊस (मि.मी.)
पार्डी टकमोर ९१.३०
राजगाव ८५.८०
केकत उमरा ७७.००
आसेगाव १२९.५०
पोटी ७८.००
धानोरा ९५.००