वाशिम जिल्ह्यात पाऊस; वादळामुळे झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:20 AM2020-06-15T11:20:12+5:302020-06-15T11:20:22+5:30

जिल्ह्यात १० जूनपासून कमी-अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस पडत आहे.

Rain in Washim district; The storm uprooted trees, disrupted power supply | वाशिम जिल्ह्यात पाऊस; वादळामुळे झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडीत

वाशिम जिल्ह्यात पाऊस; वादळामुळे झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हयात १४ जून रोजी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत सर्वदूर धुवाँवार पाऊस झाला. वादळवाऱ्यामुळे ग्रामीण भागात झाडे उन्मळून पडली तर वाशिम शहरासह अनेक ठिकाणच्या वीजपुरवठा काही वेळेसाठी खंडीत झाला. दरम्यान, या पावसामुळे १५ जूनपासून मोठ्या संख्येने शेतकरी पेरणीला सुरूवात करतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्यात १० जूनपासून कमी-अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस पडत आहे. मानोरा तालुक्याचा अपवाद वगळता मालेगाव, रिसोड, मंगरूळपीर, कारंजा व वाशिम तालुक्यात बºयापैकी पाऊस पडत आहे. १४ जून रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ६ वाजतानंतर वादळवारा आणि विजेच्या कडकडाटात दमदार पाऊस झाला. वाशिम, मालेगाव तालुक्यातील छोटेमोठे नदीनाले वाहते झाले. शिरपूर परिसरात धुवाँवार पाऊस आणि वादळवाºयामुळे ५ ते ६ झाडे उन्मळून पडली. नवीन महामार्गाचे काम सुरू असून, पावसामुळे रस्त्यालगतच्या शेतात पाणी साचले. त्यामुळे पेरणी करणाºया शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. शिरपूर परिसरात अनेक रस्त्यांची व पुलांची कामे अपूर्ण असल्याने या पावसामुळे पर्यायी रस्त्यावर चिखल निर्माण झाला. त्यामुळे वाहतूकही प्रभावित होण्याचा धोका आहे.


शेतात जाताना शेतकºयांची होणार गैरसोय
भर जहॉगीर : भर जहॉगीर परिसरात अनेक पाणंद रस्त्यांवर चिखल साचला आहे. १४ जून रोजीच्या पावसामुळे सर्व पाणंद रस्ते चिखलमय झाल्याने पेरणीसाठी शेतात जावे कसे? असा प्रश्न शेतकºयांसमोर उपस्थित झाला आहे. रोजगार हमी योजनेतून या पाणंद रस्त्यांचे मजबूतीकरण करणे आवश्यक आहे.


वीजपुरवठा खंडीत
वादळवारा आणि पाऊस यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी महावितरणने काही वेळेसाठी वीजपुरवठा खंडीत केला होता. दरम्यान ग्रामीण भागात काही ठिकाणी झाडे उन्मळून वीज वाहिनी्च्या तारांवर पडल्याची शक्यता असून, यामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला.

Web Title: Rain in Washim district; The storm uprooted trees, disrupted power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.