पावसाची दडी ; त्यातच वन्यप्राण्यांचा हैदोस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:27 AM2021-07-08T04:27:20+5:302021-07-08T04:27:20+5:30

वाशिम : मागील १४ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आणि त्यातच वन्यप्राण्यांनी पिकांमध्ये हैदोस घातल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. ...

Raindrops; Hidos of wildlife! | पावसाची दडी ; त्यातच वन्यप्राण्यांचा हैदोस !

पावसाची दडी ; त्यातच वन्यप्राण्यांचा हैदोस !

Next

वाशिम : मागील १४ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आणि त्यातच वन्यप्राण्यांनी पिकांमध्ये हैदोस घातल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

गतवर्षातील नैसर्गिक आपत्तीतून स्वत:ला सावरत यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरीप हंगामात पेरणी आटोपली. मृग नक्षत्रात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने आणि त्यानंतरही अधूनमधून पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पिके चांगलीच बहरली. परंतु, गत १४ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातच हरिण, वानर, रोही आदी वन्यप्राण्यांनी शेतात हैदोस घालून पिकांची नासाडी चालविल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. रिसोड तालुक्यातील चिखली, कवठा, किनखेडा, व्याड, वनोजा, घोटा, मालेगाव तालुक्यातील डही, वारंगी, कळंबेश्वर, मेडशी तसेच वाशिम तालुक्यातील पार्डीटकमोर, अडोळी, कार्ली शेतशिवारात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातल्याने पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांपासून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. परंतु सकाळी किंवा सायंकाळनंतर शेतात थांबणे शक्य होत नसल्याने यावेळेत वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून येते.

०००

वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा !

एकिकडे पावसाने दडी मारल्याने पिके सुकून जात आहेत तर दुसरीकडे वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने पिकांची नासाडी होत आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी दडी येथील प्रगतशील शेतकरी उमेश अवचार, दीपक अवचार, पवन अवचार आदींनी केली.

Web Title: Raindrops; Hidos of wildlife!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.