पश्चिम वऱ्हाडातील पावसाचे प्रमाण तुरीसाठी लाभदायक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 02:09 PM2018-08-31T14:09:14+5:302018-08-31T14:09:51+5:30

वाशिम: आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी पश्चिम वऱ्हाडातील  दमदार पाऊस झाल्याने खरीपातील बहुतांश पिकांना फटका बसला असला तरी, तुरीच्या पिकासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे.

Rainfall is beneficial for the toor crop | पश्चिम वऱ्हाडातील पावसाचे प्रमाण तुरीसाठी लाभदायक !

पश्चिम वऱ्हाडातील पावसाचे प्रमाण तुरीसाठी लाभदायक !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी पश्चिम वऱ्हाडातील  दमदार पाऊस झाल्याने खरीपातील बहुतांश पिकांना फटका बसला असला तरी, तुरीच्या पिकासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. पश्चिम विदर्भातील तिन्ही जिल्ह्यात सोयाबीननंतर तुरीचा पेरा सर्वाधिक असून, पावसाचे प्रमाण पाहता या पिकाच्या उत्पादनात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या तिन्ही जिल्ह्यात मिळून १ लाख ९५ हजार ८०९ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे.
पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस पडला आहे. त्यातच आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी जोरदार पावसामुळे काही ठिकाणी सोयाबीन, मुग, उडिद या पिकांना फटका बसला; परंतु खरीपातील दिर्घकालीन पिके असलेल्या तुरीच्या पिकासाठी हा पाऊस लाभदायक ठरला आहे. आता मुग आणि उडिद ही पिके काढणीवर आली आहेत, तर सोयाबीनचे पीकही महिनाभरातच काढणीवर येणार आहे. या पिकांतच आंतर पिक म्हणून तुरीची पेरणी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे ही पिके काढल्यानंतर जमिनीतील ओलावा तुरीच्या वाढीसाठी पोषक ठरून उत्पादनात वाढ होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे. तथापि, पुढे सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यास या पिकाला मारकही ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात ८१४९४, वाशिम जिल्ह्यात ५९७८०, तर अकोला जिल्ह्यातील ५४५३५ हेक्टर मिळून तिन्ही जिल्ह्यात १ लाख ९५ हजार ८०८ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी यंदा झाली असून. सद्यस्थितीत बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६४ टक्के, वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ९२ टक्के पावसाची नोंद झाली आहे, तर अकोला जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस पडल्याने तुरीच्या पिकाला मोठा फायदा होणार आहे.

ज्या जमिनीची पाणीधारण क्षमता अधिक असते त्या जमिनीवरील तुरीच्या पिकाला जास्त पावसाचा धोका असतो. तुरीची पाने पिवळी पडून उत्पादनात घट येण्याची शक्यता असते; परंतु आपल्याकडील जमिनीचा प्रकार पाहता आॅगस्ट महिन्यात झालेल्या पावसाचा तुरीला फायदा होऊन उत्पादनात काही प्रमाणात वाढ होऊ शकणार आहे.
-आर. एस. डवरे
कृषी शास्त्रज्ञ
कृषी विज्ञान केंद्र करडा (वाशिम)

Web Title: Rainfall is beneficial for the toor crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.