मंगरूळपीर तालुक्यात पावसाच्या सरासरीत वाढ
By admin | Published: June 17, 2017 12:32 AM2017-06-17T00:32:26+5:302017-06-17T00:32:26+5:30
मंगरुळ्पीर: तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या सरासरीत वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळ्पीर: तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या सरासरीत वाढ झाली आहे. मागील वर्षी जून महिन्याच्या १५ तारखेपर्यंत तालुक्यात ७५.७ मिमी पावसाची नोंद झाली होती.
पर्जन्यमापन यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार मंगरुळपीर तालुक्यात यंदा १५ जूनपर्यंत १७३.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात सर्वाधिक ९६.०० मिमी पाऊस पार्डी ताड परिसरात पडला आहे.
त्या खालोखाल मंगरुळपीर शहर परिसरात ९०.०० मिमी, शेलू खु., परिसरात ८७.०० मिमी, कवठळ परिसरात ५८.०० मिमी, धानोरा, खु परिसरात ५७.०० मिमी, आसेगाव परिसरात ५४.०० मिमी, तर पोटी परिसरात २३.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मंगरुळपीर तालुक्यात सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण असून, खरिपाच्या पेरणीला त्यांनी वेग दिल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यात नेहमीप्रमाणे यंदाही सर्वाधिक पेरा सोयाबीनचाच राहणार असला तरी, उडीद आणि मूग या पिकाच्या पेऱ्यात लक्षणीय वाढ होण्याचा विश्वास कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मागील चार दिवसांत तालुक्यात जोरदार पाऊस पडल्याने कृषी सेवा केंद्रांवर बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी उसळत असल्याचे चित्रही पाहायला मिळत आहे.