वाशिमसह शिरपूर, मसलापेन परिसरात पाऊस; शेतकरी सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 04:35 PM2019-09-01T16:35:40+5:302019-09-01T16:35:55+5:30
शिरपूर, केशवनगर परिसरात पावसाचा जोर अधिक होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गत काही दिवसांपासून गायब असलेला पाऊस १ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास वाशिम शहरासह सर्वदूर बरसला. शिरपूर, केशवनगर परिसरात पावसाचा जोर अधिक होता.
यावर्षी सुरूवातीपासूनच पावसात अनियमितता असल्याने शेतकरी चिंतातूर आहे. जून महिन्यात पावसाने दांडी मारल्याने पेरणीला प्रचंड विलंब झाला. त्यानंतरही जोरदार पाऊस झाला नाही. गत १० ते १२ दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतमालाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. १ सप्टेंबर रोजी वाशिम शहरासह मालेगाव तालुक्यात शिरपूर परिसर, रिसोड तालुक्यात खडकी, देगाव, केशवनगर, मसलापेन परिसरात पाऊस झाला. वाशिम शहराच्या तुलनेत शिरपूर, मसलापेन परिसरात पावसाचा जोर अधिक होता. यामुळे पिकांना संजिवणी मिळाली असून, शेतकरी सुखावला आहे.