वाशिममध्ये पावसाची हजेरी; पिकांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 03:41 PM2018-09-15T15:41:06+5:302018-09-15T15:41:30+5:30
वाशिम: जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शनिवारी दुपारच्या सुमारास हजेरी लावली. पाण्याअभावी सुकत चाललेल्या पिकांना या पावसामुळे आधार मिळणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शनिवारी दुपारच्या सुमारास हजेरी लावली. पाण्याअभावी सुकत चाललेल्या पिकांना या पावसामुळे आधार मिळणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
वाशिम जिल्ह्यात यंदा आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत वार्षिक सरासरीच्या ९२ टक्के पावसाची नोंद झाली होती; परंतु सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. यामुळे शेतजमिनी कोरड्या पडून पिके सुकू लागली. उडिद, मुग ही पिके काढणीवर आली असली, तरी सोयाबीन, तूर आणि कपाशी या दिर्घकालीन पिकांना पाण्याची गरज असल्याने पावसाअभावी ही पिके सुकू लागली होती. अनेक ठिकाणी, तर पावसाअभावी सोयाबीनच्या शेंगाही सुकत चालल्या होत्या. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अशात शनिवार १५ सप्टेंबर रोजी दुपारी अचानक आकाशात ढग जमले आणि काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. पाऊस जोराचा नसला तरी, रिमझीम रुपात पडलेल्या या पावसामुळे पिकांना मोठा आधार मिळाला असून, शेतकरी वर्गात या पावसामुळे थोडाफार आनंद निर्माण झाला आहे.
उडिद, मुग काढणाºयांची त्रेधा-तिरपिट
वाशिम तालुक्यात उडिद आणि मुग या पिकाची काढणी सुरू असून, शेतकरी या पिकांच्या काढणीची लगबग करीत आहेत. शनिवारी बहुतांश शेतात मळणी यंत्राद्वारे या पिकांची काढणी सुरू असताना अचानक दुपारी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकºयांची चांगलीच त्रेधा तिरपिट उडाली. उडिद, मुग भिजून पुन्हा खराब होऊ नये म्हणून शेतकºयांची झाकझूक करण्यासाठी एकच धांदल पाहायला मिळाली.