राज्यातील २७७ तालुक्यात पावसाने ओलांडली सरासरी, सप्टेंबरमध्येही पावसाचे धुमशान सुरूच

By दादाराव गायकवाड | Published: September 12, 2022 02:38 PM2022-09-12T14:38:53+5:302022-09-12T14:39:15+5:30

वाशिम: राज्यात सप्टेंबर महिन्यातही पावसाचे धुमशान सुरूच आहे. त्यामुळे ११ सप्टेंबरपर्यतच राज्यातील ३५५ पैकी २७७ तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली ...

Rains exceeded the average in 277 talukas of the state rains continue even in September | राज्यातील २७७ तालुक्यात पावसाने ओलांडली सरासरी, सप्टेंबरमध्येही पावसाचे धुमशान सुरूच

राज्यातील २७७ तालुक्यात पावसाने ओलांडली सरासरी, सप्टेंबरमध्येही पावसाचे धुमशान सुरूच

Next

वाशिम:

राज्यात सप्टेंबर महिन्यातही पावसाचे धुमशान सुरूच आहे. त्यामुळे ११ सप्टेंबरपर्यतच राज्यातील ३५५ पैकी २७७ तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. हवामान विभागाच्या अहवालानुसार ११ सप्टेंबरपर्यंत राज्यातील ३५५ पैकी तब्बल २७७ तालुक्यात शंभर टक्क्याहून अधिक, तर ७२ तालुक्यात ७५ ते १०० टक्के पावसाची नोंद झाली आहे.

मान्सून विलंबाने दाखल झाल्यानंतर जुलैपासून राज्याच्या विविध भागात पावसाने धुमाकूळ घातला, ऑगस्टमध्ये पावसाचा धडाका अधिकच वाढला. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातही पावसाचा धडाका सुरूच आहे. राज्यात सप्टेंबर महिन्यात ११ तारखेपर्यंत अपेक्षीत सरासरीच्या तुलनेत ७५.६० टक्के पाऊस पडला असला तरी १ जून ते ११ सप्टेंबरपर्यंत राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २७७ तालुक्यांत १ जूनपासून १ सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे हवामान विभागाच्या अहवालात नमूद आहे. शिवाय ७२ तालुक्यात ७५ ते १०० टक्क्यांपर्यंत पाऊस पडला आहे. शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस असलेल्या २४९ तालुक्यांत नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येकी तालुक्यातील १६, नागपूर, चंद्रपूर आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी १४, नाशिक, अहमदनगर प्रत्येकी १३, गडचिरोली जिल्ह्यातील १२, सोलापूर, सांगली, लातूर आणि अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी १०, सातारा, औरंगाबाद आणि बीडमधील प्रत्येकी ९, जालना आणि रायगड जिल्ह्यातील प्रत्येकी ८, सिंधूदुर्ग, कोल्हापूर, उस्मानाबाद, बुलढाणा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येकी ७, पालघर, जळगाव, हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी ५, वाशिम ४, ठाणे आणि अकोला जिल्ह्यातील प्रत्येकी ३, रत्नागिरी, धुळ आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी २, तर नंदूरबार जिल्ह्यातील एका तालुक्याचा समावेश आहे.

६ तालुके तहानलेलेच
राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २७७ तालुक्यात पावसाचे प्रमाण शंभर टक्क्यांपेक्षा अधिक, तर ७२ तालुक्यात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला असताना ६ तालुक्यात अद्यापही पावसाचे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यात रत्नागिरी संगमेश्वर, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, तर कोल्हापुरातील चांदगड, राधानगरी आणि बावडा या तीन तालुक्यांचा समावेश आहे.

Web Title: Rains exceeded the average in 277 talukas of the state rains continue even in September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस