शाळा परिसरात उभारला ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 06:27 PM2018-03-23T18:27:41+5:302018-03-23T18:27:41+5:30
वाशिम - अपुरा पाऊस पडल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक एस.एम.सी.इंग्लीश स्कुलमध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प उभारुन पाणी जमिनीत मुरविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
वाशिम - अपुरा पाऊस पडल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक एस.एम.सी.इंग्लीश स्कुलमध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प उभारुन पाणी जमिनीत मुरविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्याचा मोठा फायदा या शाळेला झालेला आहे. पुर्वी संस्थेला दरवर्षी उन्हाळ्यात एक ते दिड लाख रुपयांचे पाणी विकत घ्यावे लागत होते, परंतु सदर हार्वेस्टींगमुळे पाण्याची व पैशाची बचत झालेली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे वाशिम परिसरातील शाळेत उभारलेला हा पहिलाच प्रकल्प आहे. लाखाळा परिसरात नेहमीच पाणी टंचाई असते,तसेच दिवसेंदिवस पाण्याची पताळी ही खोल जात आहे. पाणी टंचाईचे चटके डिसेबर महिन्यातच जाणवायला सुरुवात होते. एकतर भुगर्भातील पण्याचा उपसा हा अधिक प्रमाणात होतो, पंरंतु त्याचे पुनर्भरण होत नाही. यामुळे पाणी टंचाईच्या समस्येला नेहमीच सामोरे जावे लागते. यावर मात करीत संस्थाध्यक्ष प्रा.हरिभाऊ क्षीरसागर व प्राचार्य मिना उबगडे यांच्या सहकार्यातुन राष्ट्रीय हरित सेना योजनेंत हा प्रकल्प उभारण्यात आला. यासाठी शाळेच्या परिसरात असलेल्या इमारतीच्या छतावरील वाहुन जाणारे पाणी पाईपलाईनव्दारे शोष खड्डा तयार करुन त्या शोष खडयामध्ये हे पाणी विंधन विहीरीमध्ये पुनर्भरण करण्यात आले. अशा प्रकारे पावसाच्या वाया जाणाºया पाण्याचा सदुपयोग करण्यात आला. या रेनवाटर हार्वेस्टींग प्रकल्पामुळे भविष्यात शाळेच्या परिसरातील पाणी टंचाईवर मात करण्यास मदत झाल्याचा दावा राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी यांनी केला. तसेच शासनाने अशा प्रकारच्या योजनांचा इतर लोकांनी आदर्श घेवुन आपल्या घरात, शाळेत कार्यालयात प्रकल्प राबवुन पाणी टंचाईवर मात करावी असे आवाहन सुध्दा करण्यात आले आहे.