भाजीपाला व्यावसायिकांना उठविल्याने राेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:18 AM2021-03-04T05:18:46+5:302021-03-04T05:18:46+5:30

मागील काही आठवड्यापासून जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार शिरपूर ...

Raising vegetable traders | भाजीपाला व्यावसायिकांना उठविल्याने राेष

भाजीपाला व्यावसायिकांना उठविल्याने राेष

googlenewsNext

मागील काही आठवड्यापासून जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार शिरपूर येथील आसेगाव रस्त्यालगत भरणारे आठवडी बाजार बंद आहेत. मात्र दररोज गुजरी चौकात काही भाजीपाला विक्रीची दुकाने लावण्यात येतात. त्यानुसार नियमित दुकाने वगळता काही भाजी उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांची थोडी अधिक दुकाने बुधवारी गुजरी चौकात लावण्यात आली. लावलेली दुकाने दुपारच्या वेळी पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने बंद केली. तर काही भाजीपाला विक्रेत्यांकडून दंडही वसूल करण्यात आला. भाजीपाल्याची दुकाने बंद करण्याच्या पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाच्या या कारवाईबाबत भाजीपाला उत्पादक शेतकरी व व्यापाऱी वर्गात राेष व्यक्त करण्यात आला. काही भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्यात.

Web Title: Raising vegetable traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.