वर्ल्ड स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:33 AM2021-01-14T04:33:20+5:302021-01-14T04:33:20+5:30
प्रिन्सिपल भावना मनोज सुतवणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन करून ...
प्रिन्सिपल भावना मनोज सुतवणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन करून अभिवादन करण्यात आलें. याप्रसंगी सूतवणे म्हणाल्या की, संस्कार, धैर्य, कर्तृत्व यांचा सुंदर मिलाप असलेल्या राजमाता जिजाऊ यांनी, मोगलांच्या जुलमी सत्तेच्या अराजकतेच्या काळात आपले हिंदवी स्वराज स्थापन करण्यासाठी शिवरायांना सर्वार्थाने सर्वच क्षेत्रात पारंगत करून घडविण्याचे महान कार्य केले. शिवबा घडले ते फक्त आणि फक्त जिजाबाईंमुळे. राजमाता जिजाबाई म्हणजे मातृत्वाचा गौरव ...!
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.
याप्रसंगी शाळेची चिमुकली श्रुती राजेश जाधव हिने राजमाता जिजाऊंच्या जीवनावर आणि कार्यावर आपल्या सुंदर आणि ओजस्वी शैलीत भाषण देऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमात प्राचार्य भावना सुतवणे, शिक्षक सारिका मगर, माधुरी मोरे, विजया वानखेडे, प्रतिभा मालस, मेघा जाधव, जसप्रीतकौर सेठी, चेतना ठाकरे, काजल कोंडाने, नीलेश विश्वकर्मा, अमित जयस्वाल, आंभोरे यांची उपस्थिती होती.