वृक्षांना राखी बांधून त्यांच्या संरक्षणाची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ!
By admin | Published: August 18, 2016 01:31 PM2016-08-18T13:31:41+5:302016-08-18T13:34:18+5:30
वाशिममधील शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षांना राख्या बांधून त्यांचे संरक्षण करण्याची शपथ घेतली.
Next
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १८ - येथील एस.एम.सी इंग्लिश स्कुलमध्ये राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग इको क्लबच्या संयुक्त विद्यमाने १८ आॅगस्ट रोजी वृक्ष रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी परिसरातील वृक्षांना राख्या बांधून त्यांचे संरक्षण करण्याची शपथ घेतली.
राखी पोर्णिमेचा सण देशात मोठया उत्साहाने साजरा केला जातो. यादिवशी बहिण भावांना प्रेमाचे प्रतिक म्हणून राख्या बांधतात आणि बहिणीचे रक्षण करावे तसेच त्यांच्या प्रिय भावास दिर्घायुष्य लाभावे याबद्दल प्रार्थना करता. नेमका हाच संदेश वापरुन इको क्लबच्या विद्यार्थ्यांनीही प्राचार्य मिना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजित मुकुंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनातून वृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे भाऊ आहेत व ते दिर्घायुषी व्हावे व त्यांनी विशेषता प्रदूषणाच्या दैत्यांपासून आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली. यावेळी चिमुकल्यांच्यावतीने परिसरातील वृक्षांना राखी बांधण्याचा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम केवळ औपचारिकता म्हणून न करता वेळोवेळी या वृक्षांच्या सुरक्षिततेबाबत खात्री करुन व वेळ पडल्यास त्यांच्या सुरक्षिततेसाठी संघर्ष करण्याचा मानस सुध्दा इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. हा स्तुत्य उपक्रम गत अनेक वर्षांपासून राबविण्यात येत असून भविष्यात त्याची व्यापती वाढविण्यात येणार आहे. वृक्ष रक्षाबंधनासाठी विद्यार्थ्यांनी पर्यावरणाला हानिकारक असणा-या घटकांना वगळून स्वताच्या हाताने तयार केलेल्या राख्यांचा वापर केला. सदर उपक्रमाला शाळेतील शिक्षिका प्रितपाल कौर सेठी व इको क्लबच्या विद्यार्थ्यााचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन व संचालन राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभितीत मुकुंदराव जोशी यांनी केले.