मानोऱ्यात दीडशे मिटरचा राष्ट्रध्वज घेऊन काढली रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 03:14 PM2019-02-16T15:14:39+5:302019-02-16T15:14:57+5:30
मानोरा : जम्मू काश्मिरमधील पुलवमा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी शनिवारी मानोरा येथे दिडशे मिटरचा राष्ट्रध्वज घेवून सर्वपक्षियांच्यावतिने रॅली काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : जम्मू काश्मिरमधील पुलवमा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी शनिवारी मानोरा येथे दिडशे मिटरचा राष्ट्रध्वज घेवून सर्वपक्षियांच्यावतिने रॅली काढण्यात आली. यावेळी वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषाने नगरी दुमदुमून गेली होती.
मानोरा शहर १६ जानेवारीला कडकडीत बंद ठेवून सर्व पक्षाच्यावतीने रॅली काढण्यात आली. यावेळी दिग्रस चौक ते शिवाजी महाराज चौक परत दिग्रस चौक मार्गे तहसील कार्यालयात रॅली पोहचल्यानंतर शाहिद जवान यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी तहसीदार डॉ. सुनील चव्हाण यांचे मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले . यावेळी विध्यार्थी,व्यापारी, राजकीय पक्षांचे प्रमुख सह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीचे मुख्य आकर्षण पुसद येथून तयार करुन आणलेला दिडशे मिटरचा ‘राष्ट्रध्वज' ठरला होता.