रामनवमी यात्रा उत्सव उत्साहत साजरा, सेवालाल चरणी लाखो भाविक नतमस्तक
By नंदकिशोर नारे | Updated: April 17, 2024 17:14 IST2024-04-17T17:11:38+5:302024-04-17T17:14:40+5:30
अनेक पायदळ पालखीचे स्वागत.

रामनवमी यात्रा उत्सव उत्साहत साजरा, सेवालाल चरणी लाखो भाविक नतमस्तक
नंदकिशाेर नारे, वाशिम : बंजारा समाजाची काशी म्हणून ख्याती असलेल्या पोहरादेवी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लाखो भाविकांच्या उपस्थितीत रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा आंध्रप्रदेश,गुजरातसह संपूर्ण देशातून आलेले भाविक बुधवार पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले.
मंगळवारी वादळी वाऱ्यासह पाऊसाने हजेरी लावली असतानाही भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते. संत सेवालाल महाराज व राष्ट्रसंत डॉ रामरावबापू महाराज यांचा जयघोष यावेळी करण्यात आला. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या भक्तिधाममध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी जगदंबादेवी, जगद्गुरु संत सेवालाल महाराज, राष्ट्रसंत डॉ रामराव महाराज, दानशूर संत बाबनलाल महाराज मंदिरात जनमोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. भोगभंडारा अर्पण केल्या नंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.