पशु-पक्ष्यांना दररोज अन्नदान करणारा राम
By Admin | Published: January 9, 2017 03:36 PM2017-01-09T15:36:24+5:302017-01-09T15:36:24+5:30
नंदकिशोर नारे वाशिम, दि. 9 - पशु-पक्ष्यांविषयी प्रेम असल्याने दिनचर्या म्हणून पोलीस खात्यातील राम नामक कर्मचारी दररोज अन्नदान करुन त्यांची ...
नंदकिशोर नारे
वाशिम, दि. 9 - पशु-पक्ष्यांविषयी प्रेम असल्याने दिनचर्या म्हणून पोलीस खात्यातील राम नामक कर्मचारी दररोज अन्नदान करुन त्यांची भूक व तहान भागविण्याचे कार्यकरित आहे. गत दोन वर्षांपासून ते हे कार्य अविरतपणे राबवित आहेत. विशेष म्हणजे पक्ष्यांना सुध्दा त्यांची चाहुल लागताचं त्यांच्या बाजुला घिरटया घालतांना अनेकांनी पाहीले आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील रहिवासी तथा मालेगाव पोलीस स्टेशानला पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेले रामविलास वासुदेव गुप्ता (बक्कल नं. ९४४) परिसरात ह्यरामह्ण या नावाने परिचित आहेत. शिरपूर ते मालेगाव दररोज अपडाऊन करतांना मधात लागत असलेल्या जउळका रेल्वे येथे असलेल्या एका वृक्षाजवळ व बाजुलाच असलेल्या हॉटेलमधून खाद्य पदार्थ घेणे व तेथे पक्ष्यांसाठी ठेवण्याचे कार्य रामच्यावतिने गत दोन वर्षांपासून अविरत सुरु आहे.
आजच्या घडीला पक्ष्यांनाही त्यांची येण्याची चाहुल लागताच ते त्यांच्या आजुबाजुला फिरतांना दिसून येतात. ते नियमितप्रमाणे बाजुच्या हॉटैलमधून खाद्य पदार्थ घेवून ठरलेल्या ठिकाणी ठेवल्याबरोबर १०० ते १५० कावळयांसह इतरही पक्षी ते खाण्यासाठी येतात. बाजुलाच त्यांच्यासाठी पाण्याचीही व्यवस्था त्यांनी करुन ठेवली आहे. पक्ष्यांविषयी असलेल्या या रामच्या प्रेमाबाबत परिसरात त्यांचे कौतूक केले जात आहेत.
कारंजा येथे गुरांसाठी चारा व पाण्याचीही केली होती व्यवस्था
पशु-पक्ष्यांविषयी असलेल्या प्रेमापोटी रामविलास यांनी कारंजा येथे कर्तव्यावर असतांना २०१२ मध्ये गुरांसाठी चारा व्यवस्था व पाण्याचा हौद पोलीस स्टेशनसमोर बांधला होता. दररोज तेथेही त्यांची ते सेवा करायचे. आज ते तिथे नसल्याने हौद कोरडा पडला आहे.
दर मंगळवार व शनिवारी असतो त्यांच्या बाजुला माकडांचा गराडा!
जेथे हे जावे तेथे त्यांच्या बाजुला पशु- पक्ष्यांचा गराडा असतोच. मालेगाव येथील पोलीस स्टेशन आवारात महादेवाचे मंदिर आहे. येथे सुध्दा ते दर मंगळवार व शनिवारी चने, फुटाणे, शेंगदाणे झाडानजिक ठेवत असल्याने १५ ते २० माकडे ते सेवन करतांना दिसून येतात. विशेष म्हणजे दर मंगळवारी व शनिवारी त्याांच्या बाजुला माकडांचा गराडा दिसून येतो.
ना-बोलता येते ना- सांगता येते. फक्त कृतीवरुन आपण समाधानी असल्याचे जाणवते., अश्या पशु-पक्ष्यांनी आपल्याला पाहून किलबिलाट करतात त्याचे समाधान वाटते. पक्षु-पक्ष्यांना अन्नदान करण्याचा आपण छंद जोपासला आहे.
- रामविलास शर्मा
https://www.dailymotion.com/video/x844nq3