वाशिम जिल्ह्यात ९० पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर ‘रॅम्प’ची व्यवस्था !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 03:30 PM2019-04-09T15:30:28+5:302019-04-09T15:30:39+5:30
वाशिम : ११ एप्रिल रोजी मतदान होणाºया यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यात १६६१ दिव्यांग मतदारांची नोंद असून, ९० पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर ‘रॅम्प’ची व्यवस्था करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ११ एप्रिल रोजी मतदान होणाºया यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यात १६६१ दिव्यांग मतदारांची नोंद असून, ९० पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर ‘रॅम्प’ची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर प्रवेश करून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व साहित्य सहजतेने हाताळता यावे व दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे, दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती, मार्गदर्शन, मतदान केंद्रांवर कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी समाजकल्याण विभागाला दिल्या होत्या. या सूचनांच्या अनुषंगाने समाजकल्याण विभागाने जय्यत तयारी केली असून, ११ एप्रिल रोजी होणाºया मतदानासाठी १६६१ दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. मतदान केंद्रांत कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवेश करण्यासाठी ९० पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या दिव्यांगाच्या विशेष शाळेतील १०० पेक्षा जास्त कर्मचाºयांची १३१ मतदान केंद्रांवर नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे, त्यांना सुखरूप मतदान केंद्रांवर आणणे आणि मतदान करून घरी सुखरूपपणे सोडणे यासाठी सदर कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. त्यांना तत्काळ मतदान केंद्रांवर प्रवेश देण्यात येईल, असे निर्देश जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर देण्यात आलेले आहेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्रांवर विशेष वाहनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर, सहायक आयुक्त माया केदार यांच्यासह जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. दिव्यांगांनी १०० टक्के मतदान करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले.