मालेगाव येथे रानभाजी महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:48 AM2021-08-18T04:48:20+5:302021-08-18T04:48:20+5:30

जय गजानन महिला बचत गट भेरा ला प्राप्त मालेगाव : येथील तहसील कार्यालयात कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाज्या ...

Ranbhaji Festival at Malegaon | मालेगाव येथे रानभाजी महोत्सव

मालेगाव येथे रानभाजी महोत्सव

googlenewsNext

जय गजानन महिला बचत गट भेरा ला प्राप्त

मालेगाव : येथील तहसील कार्यालयात कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाज्या महोत्सवामध्ये प्रथम क्रमांक वैयक्तिक लाभार्थी गजानन तुळशीराम वानखडे शिरपूर, द्वितीय क्रमांक गणेश भीमराव पोफळे, तृतीय क्रमांक माविमच्या जय गजानन महिला बचत गट भेराला प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

ग्रामीण भागातील शेतशिवारामध्ये नैसर्गिकरीत्या रानभाजी व रानफळे यांचे आहारातील महत्त्व व लाभकारक गुणधर्म शहरी भागातील नागरिकांना समजणे तसेच रानभाजीचा समावेश आहारामध्ये होण्याच्या दृष्टीने आणि रानभाजी विक्रीस कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाच्या निर्देशानुसार कृषी विभागाच्या वतीने मालेगाव तालुक्यामध्ये १४ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय सभागृह मालेगाव येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये लोकसंचालित साधन केंद्र मालेगाव २ च्या अंतर्गत १५ बचत गटांनी सहभाग घेऊ ५१ प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावले होते. महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात नगरपंचायत मालेगावचे मुख्याधिकारी विकास खंडारे यांच्या हस्ते विजयी स्पर्धेकांनी प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह स्वीकारले. यावेळी विचार मंचावर तहसीलदार रवी काळे, तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरूनकर, माविम सीएमआरसी मालेगाव २ चे व्यवस्थापक प्रा. शरद व्ही. कांबळे, कृषी पर्यवेक्षक सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. रानभाज्या महोत्सवाचे उद्‌घाटन आमदार अमित झनक यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माविम बचत गटाच्या सहभागाबद्दल कौतुक केले होते. महिलांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, याकरिता गटाच्या सर्व महिला सहभागी झाल्या होत्या. सहभागी सर्व महिलांचे आमदार अमित झनक यांनी कौतुक करून प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक मानवतकर यांनी तर आभार कृषी पर्यवेक्षक सावंत यांनी मानले.

170821\img-20210817-wa0052.jpg

बक्षिसे वाटप

Web Title: Ranbhaji Festival at Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.