रांगोळी, चित्रकलेतून विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 08:06 PM2017-10-03T20:06:19+5:302017-10-03T20:07:55+5:30
वाशिम : स्वच्छता पंधरवड्यानिमित्त आयोजित रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आकर्षक कलाकृती सादर करून लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला. तालुक्यातील काजळांबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यावर्षी १७ सप्टेंबर ते २ आॅक्टोंबर २०१७ महात्मा गांधी जयंतीपर्यंत स्वच्छता पंधरवाडा पाळण्यात आला. या अनुषंगाने दररोज शाळेच्यावतीने गाव स्वच्छ व हागणदारी मुक्त करावयाचा संकल्प घेऊन वेगवेगळ्या कार्यक्रमाव्दारे जनजागृती केली. या अंतर्गतच रांगोळी व चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता ३ री ते ५ वी चा ब गट व इ. ६ वी ७, वीपर्यंतचा अ गट अशा दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थीनी सहभाग घेऊन आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांची चुणुक दाखविली. विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक रांगोळी काढल्या, या रांगोळी स्पर्धाचे निरीक्षण गावच्या सरपंचा शशिकला संजय मनवर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्लराव राऊत, ग्रा.पं.सदस्य सुरेश सोनटक्के, तंटामुक्त गाव समिती चे अध्यक्ष साहेबराव उगले, कला निर्देशक माधुरी भगत यांनी केले.