राणी लक्ष्मीबाई शाळेत उभारले ‘भूगोल दालन’!
By Admin | Published: January 14, 2017 01:24 AM2017-01-14T01:24:42+5:302017-01-14T01:24:42+5:30
जागतिक भूगोल दिनानिमित्त विद्यार्थ्यांंनी साकारली अप्रतिम कलाकृती .
शिखरचंद बागरेचा
वाशिम, दि. १३- जागतिक भूगोल दिनाचे औचित्य साधून स्थानिक राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांंनी शाळेतील राजशेखर रंगमंचावर विविध कलाकृतींचे 'भूगोल दालन' उभारण्यात आले, असा आगळावेगळा उपक्रम राबविणारी ही शाळा जिल्ह्यातील एकमेव ठरली आहे.
१४ जानेवारी हा दिवस जागतिक भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि उत्तर गोलार्धात असणार्या भूप्रदेशात दिनमान वाढत जातो. युरोपियन खलाशी ख्रिस्तोकार कोलबंस, जेम्स कुक, करिनाद मंगेरुन, मार्कोपोलो यांनी विविध प्रदेशाचे नकाशे तयार केले. त्यात भारताचा नकाशा सर्वप्रथम इ.स. १७५२ साली एनविले या भूगोल तज्ज्ञाने तयार केला. हिरोडोटस रोमन तज्ज्ञ क्लाडियस टॉलेम यांनी भुगोल विषयाला विशिष्ट आयाम मिळवून दिला. तथापि, १४ जानेवारी हा दिवस भुगोल दिन म्हणून साजरा केला जात असून या औचित्यावर राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत बारीक निरीक्षणातून विविध भुप्रदेशाचे नकाशे, भुगोल संकल्पनेवर आधारित आकृत्या, तक्ते, होकायंत्र, दिशादर्शक यंत्र, आदी साधनाची निर्मिती करुन सुसज्ज असे भुगोल दालन उभारण्यात आले.
विद्यार्थींंनीतर्फे भेट दिलेल्या नवीन नकाशाचे अनावरण मुख्याध्यापिका स्वाती कुळकर्णी यांनी केले. तसेच पर्यावरण रक्षणासाठी जागरुक राहण्याचे आवाहन करण्यात आले. ह्यनियमित पडेल वृष्टी; तर पानाफुलांनी बहरेल सृष्टीह्ण, ह्यसागरामध्ये दिशेचा मंत्र, मदत करेल होकायंत्रह्ण, आकलन करता हवामान, व्यवसाय निवडीचे होईल ज्ञानह्ण, अशा पद्धतीच्या सुभाषितांची निर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमाची संकल्पना व संयोजन भुगोल शिक्षक संतोष काळे यांचे होती. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षीका व कर्मचारी यांनी उपस्थिती दर्शविली.