अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 03:08 PM2020-02-25T15:08:16+5:302020-02-25T15:08:26+5:30

लैंगीक अत्याचार प्रकरणी २० वर्षे शिक्षा देण्याचा हा पहिलाच अभूतपूर्व निकाल आहे.

Rape a minor girl; 20 years regorious imprisonment for the accused | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार करणारा आरोपी नंदु उर्फ गजानन वामन भिंगारदिवे (५०) याला वाशिम येथील तदर्थ अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश डॉ. रचना तेहरा यांनी २० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा २४ फेब्रुवारी रोजी सुनावली.
पिडीतेच्या आईने वाशिम शहर पोलीस स्टेशनला १३ जानेवारी २०१८ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, पिडीत अल्पवयीन मुलगी ही परिवारासह आरोपीच्या घराशेजारी भाड्याने राहत होती. घटनेच्या दिवशी दुपारी ३.३० वाजता पिडीत मुलगी ही आवारात खेळण्यास गेली असता, सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत पिडीत घरी परत आली नाही. शोधाशोध केली असता, अरोपीच्या घराच्या वरच्या मजल्यावरुन घाबरलेल्या अवस्थेत ती दिसून आली. विचारपूस केली असता, पिडीतीने सर्व घटनाक्रम आईला सांगितला. यावरून आरोपीविरूद्ध भांदवी ३७६ (आय), ३७७ तसेच पोक्सो कलम ४,१२, नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. तपास अधिकारी अस्मिता मनोहर यांनी विद्यमान न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे एकुण ४ साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. सबळ पुरावे आढळुन आल्यामुळे तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधिश डॉ. रचना तेहरा यांनी कलम ३७६ (आय) न ुसार २० वर्ष सक्तमजुरी व ५ हजार दंड तसेच दंड न भरल्यास ३ महिने शिक्षा तसेच कलम ३७७ मध्ये ७ वर्ष सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने सक्तमजुरी तसेच पोक्सो १२ नुसार १ वर्ष सक्तमजुरी, २ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना सक्तमजुरी शिक्षा सुनावली. लैंगीक अत्याचार प्रकरणी २० वर्षे शिक्षा देण्याचा हा पहिलाच अभूतपूर्व निकाल आहे. सरकार पक्षाचे वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता माधुरी मिसर यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून तृप्ती पाटील यांनी कामकाज पाहिले.
(प्रतिनिधी)

Web Title: Rape a minor girl; 20 years regorious imprisonment for the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.