दुर्मिळ सापाला जीवदान !

By admin | Published: June 18, 2017 07:22 PM2017-06-18T19:22:16+5:302017-06-18T19:22:16+5:30

नानेटी जातीच्या सापाला सर्पमित्रांनी जीवदान दिले.

Rare snake lives! | दुर्मिळ सापाला जीवदान !

दुर्मिळ सापाला जीवदान !

Next

वाशिम - स्थानिक सिव्हिल लाईनस्थित म्हाडा कॉलनीत शनिवारी रात्री निघालेल्या दूर्मिळ अशा नानेटी जातीच्या सापाला सर्पमित्रांनी जीवदान दिले.
म्हाडा कॉलनीत शनिवारी रात्रीच्या सुमारास साप निघाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी सर्पमित्रांना दिली होती. यावरून सर्पमित्र सर्वेश फुलउंबरकर, महेश इंगळे, गोकुळ ताजने, अमोल वाघमारे यांनी घटनास्थळ गाठले. तिथे गेल्यावर त्यांना ह्यनानेटी जातीचा (बिनविषारी) साप असल्याचे दिसून आले. या जातीचा साप वाशिम शहरात प्रथमच निदर्शनात आला, अशी माहिती सर्पमित्र फुलउंबरकर यांनी दिली. या सापाला पकडून शहरी वस्तीच्या बाहेर जंगलात अनुकूल ठिकाणी सोडण्यात आले आहे.

Web Title: Rare snake lives!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.