राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त कारंजात विदर्भस्तरीय महिला व बालभजन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 04:56 PM2018-01-20T16:56:24+5:302018-01-20T17:00:15+5:30
कारंजा : वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शनिवार २० जानेवारीपासून विदर्भस्तरीय महिला व बाल खंजेरी भजन स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.
कारंजा : वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शनिवार २० जानेवारीपासून विदर्भस्तरीय महिला व बाल खंजेरी भजन स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. शेतकरी निवास येथे होत असलेल्या या दोन दिवसीय विदर्भस्तरीय भव्य महिला व बाल खंजेरी भजन स्पर्धेत ७१ हजार रुपयांचे बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सकाळी ११ वाजता कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती व माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या अध्यक्षतेखाली अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरीचे सरचिटणीस हभप जनार्दन बोथे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश राऊत, उपजिल्हा प्रमुख दिनेश राठोड, पं.स.सभापती वर्षा नेमाने, उपसभापती मधुकर हिरडे, जि.म.बँक संचालक श्रीधर कानकिरड, खविसं अध्यक्ष बाबाराव ठाकरे, उपाध्यक्ष वसंत लळे, माजी जि.म.बँक संचालक उत्तमराव ताथोड, दत्तराज डहाके, जि.प.सदस्य देवेंद्र ताथोड, अॅड. अशोक ताथोड, अॅड.संतोष भिंगारे, सुनिल देशमुख, सुधाकर जाधव, गणेश ठाकरे, शहर प्रमुख गणेश बाबरे आदि मान्यवरांची उपस्थिती होती. या स्पर्धेत सहभागी होणाºया भजनी मंडळांपैकी विजेत्या मंडळास बक्षिस १५००१ रुपये, उपविजेत्यांना ९००१ रु., तृतिय स्थानासाठी ७००१ रु, चौथ्या स्थानासाठी ६००१ रु., तर पाचव्या स्थानासाठी ५००१ रु. बक्षीस देण्यात येईल. त्याशिवाय उत्कृष्ट तबला, हार्मोनियम व गायक यांना प्रत्येकी ३०१ रुपयाचे वैयक्तिक बक्षीस देण्यात येणार आहे.