‘लॉकडाऊन’मुळे रसवंती बंद; शेतकऱ्याने केली ऊसापासून गुळ निर्मिती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 01:56 PM2020-05-23T13:56:10+5:302020-05-23T13:57:56+5:30
शेतकरी पुन्हा एकवेळ ऊसापासून गुळ निर्मितीकडे वळले आहेत.
Next
ल ोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : : परिसरात १९९० पुर्वी मोठ्या प्रमाणात गुºहाळ सुरू झाले होते; मात्र तुलनेने गुळ निर्मितीचा व्यवसाय परवडत नसल्याने कालांतराने ते बंद झाले. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर ऐन उन्हाळ्यात गेल्या ५८ दिवसांपासून सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे रसवंत्या बंद असल्याने बहुतांश शेतकरी पुन्हा एकवेळ ऊसापासून गुळ निर्मितीकडे वळले असून बंद पडलेले गुऱ्हाळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील अन्य शेतकºयांप्रमाणेच शिरपूर येथील प्रयोगशिल शेतकरी संतोषराव वाघ (देशमुख) यांनी प्रामुख्याने रसवंतीच्या व्यवसायाकरिता शेतात ऊस लागवड केली. यामाध्यमातून दरवर्षीच्या उन्हाळ्यात किमान ५ लाखांची मिळकत होते, असे त्यांनी सांगितले; परंतु चालूवर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गाने ऐन उन्हाळ्यात डोके वर काढले असून गेल्या ५८ दिवसांपासून ‘लॉकडाऊन’ लागलेला आहे. परिणामी, रसवंती सुरू करणे शक्यच झाले नाही. त्यामुळे नुकसान होऊ नये, यासाठी बंद पडलेला गुºहाळ सुरू करून गुळ निर्मितीचे काम त्यांनी हाती घेतले. अर्धा एकर शेतात लावलेल्या ऊसापासून ३० क्विंटल (किंमत दीड लाख रुपये) यासह ३ क्विंटल पाक (किंमत १५ हजार रुपये) मिळाले असून गतवर्षी दसरा व दिवाळीला बाजारात ९० हजारांचा ऊस विक्री केला; तर ऊस लागवड व मजूरीपोटी ८० हजारांचा खर्च लागल्याचे शेतकरी संतोषराव वाघ यांनी सांगितले.