संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 03:32 PM2018-11-26T15:32:45+5:302018-11-26T15:33:02+5:30
वाशिम : संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
भारतीय संविधान सन्मान दिनानिमित्त जिल्हाभरात शाळा, महाविद्यालयांसह शासकीय, निमशासकीय कार्यालयांत विविध कार्यक्रम घेण्यात आले. तसेच स्वयंसेवी संस्था, संघटनांनीदेखील संविधान सन्मान दिन साजरा केला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, तहसीलदार राजेश वजीरे, रणजीत भोसले, वैशाख वाहूरवाघ, अधीक्षक राहुल वानखेडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेतही संविधान सन्मान दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी, कर्मचाºयांची उपस्थिती होती.