राठी विधि महाविद्यालयात वाचन दिन साजरा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:27 AM2021-06-20T04:27:37+5:302021-06-20T04:27:37+5:30
या ऑनलाइन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.सुशांत चिमणे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक ग्रंथपाल प्रा.संजय इढोळे यांनी कार्यक्रमाची सविस्तर ...
या ऑनलाइन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.सुशांत चिमणे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक ग्रंथपाल प्रा.संजय इढोळे यांनी कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा मांडली व वाचनाचे महत्त्व विषद केले, तसेच ग्रंथालयात वर्षभर विविध उपक्रम कसे साजरे केले जातात, याची माहिती उपस्थितांना दिली. याप्रसंगी विद्यार्थी अविनाश खंडारे, प्रीती कल्ले, पूजा वानखेडे यांनी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.चिमणे म्हणाले की, सध्याच्या काळात विद्यार्थी हा पुस्तकापासून लांब गेला असून, तो मोबाइलमध्ये गुंतला आहे. चांगली पुस्तके वाचल्यामुळे व्यक्तिमत्त्वात सुधारणा होऊ शकते. पुस्तके संस्कारांची पायाभरणी करतात, म्हणून विद्यार्थ्यांनी अधिकाधिक पुस्तके वाचावी, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला ग्रंथालय विभागाचे सदस्य डॉ.सागर सोनी, महादेव सोमाणी, प्रा.ललिता दाभाडे, प्रा.भाग्यश्री धुमाळे, पवार, जितेंद्र अग्रवाल व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येत ऑनलाइन उपस्थित होते.