यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वाचन दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:27 AM2021-06-20T04:27:18+5:302021-06-20T04:27:18+5:30
संस्थेचे सचिव चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सूर्यकांत कान्हेरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात ...
संस्थेचे सचिव चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सूर्यकांत कान्हेरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून कोविड-१९ अवरनेस प्रोग्राम या विषयावर वेबिनारचे आयोजन आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या वेबिनारचे उद्घाटन प्राचार्य डॉ. सूर्यकांत कान्हेरकर यांनी केले. त्यानंतर प्रा.डॉ.प्रमोद देवके (रासेयो कार्यक्रम अधिकारी) यांनी आपल्या प्रास्ताविकातून कोविड-१९ या आजाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर व्हावेत या उद्देशाने वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये डॉ. धनाजी जाधव यांनी काेराेना संसर्गजन्य आजारांचा संपूर्ण इतिहास विद्यार्थ्यांसमोर उभा केला. प्रमुख मार्गदर्शक व वक्ते म्हणून प्रा.डॉ.अंजुम खान यांनी आपल्या भाषणामधून काेविड आजारापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार प्रा. डॉ. प्रमोद देवके यांनी मानले.