शासनमान्य ग्रंथालयांमध्ये साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 08:03 PM2017-10-09T20:03:41+5:302017-10-09T20:04:15+5:30
वाशिम: देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दूल कलाम यांचा जन्मदिवस १५ आॅक्टोबरला असून यादिवशी जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालयांमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला जाणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी पी.एम.राठोड यांनी दिली.
ठळक मुद्दे१५ आॅक्टोबरला माजी राष्ट्रपती एपीजे अब्दूल कलाम यांचा जन्मदिवस जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालयांमध्ये साजरा केला जाणार
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दूल कलाम यांचा जन्मदिवस १५ आॅक्टोबरला असून यादिवशी जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालयांमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला जाणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी पी.एम.राठोड यांनी दिली.
वाचन संस्कृती वृद्धींगत व्हावी, यासाठी व्याखान, चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. निवडक कथा, कवितांचे अभिवाचन करणे, निबंध स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा किंवा एखाद्या प्रसिद्ध लेखकाची प्रकट मुलाखत अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन ग्रंथालयांनी करावे, असे आवाहन राठोड यांनी केले आहे.