वाचनाची आवड जोपासावी - सुनील कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 07:52 PM2017-10-13T19:52:10+5:302017-10-13T19:53:15+5:30
माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार १३ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार १३ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, अधीक्षक आनंद देऊळगावकर, महसूलच्या तहसीलदार शीतल वाणी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कोरडे म्हणाले, वाचनामुळे व्यक्ती ज्ञानी बनते, तसेच वाचनामुळे माणसाचे आयुष्य वैचारिक दृष्ट्या समृद्ध बनते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करून ती जोपासण्याची गरज आहे. आजची पिढी मोबाईलच्या अति वापरामुळे वाचनापासून दूर जात आहे. त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी पालकांनी प्रयत्न केले पाहिजेत. बदलत्या काळानुसार वाचनाची अनेक साधने निर्माण झाली आहेत, त्याचा उपयोग करून घेऊन आपले ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजेत. शासकीय सेवेतील प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयाने दिवसातून किमान एक तास वेळ वाचनासाठी दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.