शत्रूशी दोन हात करायला केव्हाही सज्ज!
By admin | Published: July 9, 2017 09:36 AM2017-07-09T09:36:56+5:302017-07-09T09:36:56+5:30
सीमेवर शत्रूशी दोन हात करायला भारतीय सैन्य केव्हाही सज्ज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी शनिवारी केले.
वाशिम: सीमेवर शत्रूशी दोन हात करायला भारतीय सैन्य केव्हाही सज्ज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी शनिवारी केले.
"सबका साथ सबका विकास" संमेलनानिमित्त संरक्षण राज्यमंत्री भामरे वाशिम येथे आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ना. भामरे म्हणाले, देशाचे संरक्षण करण्यासाठी नेतृत्व सक्षम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशावरून भारतीय सैन्याने यशस्वी सर्जिकल स्ट्राइक केले. गेल्या तीन वर्षांंंत सरकारने संरक्षण खात्यात आमूलाग्र बदल केले आहेत.
भारत शांतीप्रिय देश आहे; परंतु जर कुणी आमच्या शांततेचा भंग करणार असेल, सीमेवर आगळीक करीत असेल तर त्यांना त्यांच्या घरात घुसून धडा शिकवण्यास भारतीय सैन्य सक्षम असल्याचेही ना. भामरे म्हणाले. पत्रकार परिषदेला राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांची उपस्थिती होती.