पल्स पोलिओसाठी सज्ज

By admin | Published: January 17, 2015 12:36 AM2015-01-17T00:36:27+5:302015-01-17T00:36:27+5:30

वाशिम जिल्ह्यात ९२0 बुथची स्थापना.

Ready for Pulse Polio | पल्स पोलिओसाठी सज्ज

पल्स पोलिओसाठी सज्ज

Next

वाशिम : जिल्ह्यात १८ जानेवारी २0१५ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केली आहे.
जिल्ह्यात 0 ते ५ या वयोगटातील अपेक्षित बालकांची संख्या ग्रामीण भागात ९३ हजार २९0 तर नागरी भागात ३५ हजार ६४९ अशी एकूण १ लाख २८ हजार ९३९ इतकी आहे. या सर्व बालकांना पोलिओ लस देण्यासाठी ग्रामीण भागात ८१0 तर नागरी भागात ११0 असे एकूण ९२0 पल्स पोलिओ लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले आहेत. तेथे काम करण्यासाठी ग्रामीण भागात २ हजार १३६ तर नागरी भागात ३१९ असे एकूण २ हजार ४५५ इतके कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामीण भागात १६२ व नागरी भागात २२ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी ८ वाजलेपासून सायंकाळी ५ वाजेपयर्ंत बूथवर लस देण्याचे काम सुरु राहणार आहे. तसेच वीट भट्टी, गिट्टी खदान, मजुरांच्या वस्त्या येथे जावून लसीकरण करण्यासठी ग्रामीण भागात २६ तर नागरी भागात ७ फिरती पथके स्थापन करण्यात आली आहेत. याशिवाय प्रवासातील बालकांना लस देण्यासाठी ९७ पथके कार्यरत राहणार आहेत. त्यानंतर २0 ते २२ जानेवारी दरम्यान ग्रामीण भागात पोलिओ डोस दिली जाणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागात १ हजार ५७५ तर शहरी भागात १ हजार ९५५ चमू तयार करण्यात आले आहेत. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीमार्फत प्रत्येक गावात एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी एम.एस. बायस यांनी दिली

Web Title: Ready for Pulse Polio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.