रिसोडसाठी तिसऱ्या टप्प्याचा दुष्काळी निधी प्राप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 03:00 PM2019-03-02T15:00:24+5:302019-03-02T15:00:34+5:30

वाशिम: राज्यशासनाने मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या रिसोड तालुक्यातील शेतकºयांसाठी दुष्काळी निधीच्या तिसºया टप्प्याचा १७ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

Receive drought relief fund for the third phase of Risod | रिसोडसाठी तिसऱ्या टप्प्याचा दुष्काळी निधी प्राप्त 

रिसोडसाठी तिसऱ्या टप्प्याचा दुष्काळी निधी प्राप्त 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्यशासनाने मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या रिसोड तालुक्यातील शेतकºयांसाठी दुष्काळी निधीच्या तिसºया टप्प्याचा १७ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. हा निधी रिसोड तहसील कार्यालयाकडे वळता करण्यात आला असून, या निधीचे दुष्काळग्रस्त शेतकºयांना वितरणही करण्यात येत आहे. आजवर रिसोड तालुक्यासाठी शासनाकडून एकूण ४४,१०,८६,७२० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 
रिसोड तालुक्यात शासनाने मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) तालुक्यात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या पथकाच्या पाहणीनुसार रिसोड तालुक्यातील १०० गावांतील दुष्काळी स्थिती असल्याचे स्पष्ट झाले. या पथकाच्या अहवालानंतरच शासनाने रिसोड तालुक्यासाठी दुष्काळी निधी वितरित करण्यास मंजुरी दिली होती. महसूल प्रशासनाने या १०० गावांतील प्रत्यक्ष दुष्काळाची झळ पोहोचलेल्या ५५११५ शेतकºयांची यादी तयार केली आहे. या शेतकºयांना दुष्काळी निधीचे वितरण करण्यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात १३ कोटी ६९ लाख, दुसºया टप्प्यात १३ कोटी तर तिसºया टप्प्यात १७ कोटी ४१ लाख रुपये मिळून एकूण ४४ कोटी १० लाख ८६ हजार ७२० रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. हा निधी रिसोड तहसील कार्यालयाकडे वळता करण्यात आला असून, २८ फेब्रुवारीपर्यंत या निधीतून ३९६९७ शेतकºयांच्या खात्यात ३३ कोटी कोटी ६४ लाख, ६१ हजार ४०० रुपये दुष्काळी मदत म्हणून वितरीत करण्यात आले आहेत. त्याशिवाय २७ गावांतील ७९९४  शेतकºयांसाठी दुष्काळी मदत म्हणून ६ कोटी ८५ लाख ६४ रुपयांची देयके सादर करण्यात आली आहेत.

Web Title: Receive drought relief fund for the third phase of Risod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.