सरपंचांकडून पर्जन्याची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:25 AM2021-07-22T04:25:36+5:302021-07-22T04:25:36+5:30
पुलावरील भगदाड बुजवावे ! वाशिम: वाशिम तालुक्यातील वाशिम ते अनसिंग मार्गावरील दगड उमरा ते दगड उमरा फाट्यादरम्यानच्या रस्त्यावरील पुलास ...
पुलावरील भगदाड बुजवावे !
वाशिम: वाशिम तालुक्यातील वाशिम ते अनसिंग मार्गावरील दगड उमरा ते दगड उमरा फाट्यादरम्यानच्या रस्त्यावरील पुलास मोठे भगदाड पडले आहे. यामुळे अपघाताची भीती असताना या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्थांत रोषाचे वातावरण आहे.
-------
कोरोना निर्बंधांकडे ग्रामस्थांचे दुर्लक्ष
वािशम: कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रशासनाच्या निर्बंधाबाबत मालेगाव तालुक्यातील मेडशी परिसरात ग्रामस्थ गंभीर नाहीत. विविध व्यवहारांसाठी दुकानांवर गर्दी करताना तोंडाला मास्क व रुमाल न बांधताच ग्रामस्थांचा सार्वजनिक ठिकाणी मुक्त संचार सुरू आहे.
--------
वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान
वाशिम: बांबर्डा परिसरात सध्या खरीप पिके डोलदार असून, हरिण, माकड आदी वन्यप्राणी पिकांत धुमाकूळ घालत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचे २१ जुलै दिसून आले. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांनी वनविभागाकडे केली.
--------------
फवारणी करताना काळजी घेण्याचे आवाहन
वाशिम: सध्या शेतकरी खरीप पिकातील तण नियंत्रणासाठी तणनाशकाची फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. ही फवारणी करताना शेतकºयांनी फवारणी किट आणि पायात लांब बूट घालूनच फवारणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकाऱ्यांनी मंगळवारी केले.
------
ग्रामस्थांना आरोग्याबाबत मार्गदर्शन
वाशिम: कारंजा तालुक्यातील धामणी खडी येथे ग्रामपंचायतकडून पावसाळ्यातील आजार थांबविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत स्वच्छतेबाबत जनजागृती सुरू करण्यात आली आहे.