वाशिम बाजार समितीत हळदीची विक्रमी आवक
By admin | Published: April 26, 2017 01:28 AM2017-04-26T01:28:11+5:302017-04-26T01:28:11+5:30
वाशिम: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रमी आवक होत असून, या वाणाच्या मोजणीसाठी वेळ मिळावा म्हणून सोमवारी इतर वाणांची मोजणी थांबविण्यात आली होती.
वाशिम: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रमी आवक होत असून, या वाणाच्या मोजणीसाठी वेळ मिळावा म्हणून सोमवारी इतर वाणांची मोजणी थांबविण्यात आली होती.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळद लागवड होत असतानाही या वाणाला बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना हळद विक्रीसाठी इतर जिल्ह्यात न्यावी लागत होती. परिणामी, शेतकऱ्यांना वाहतूकीचा भुर्दंड सहन करावा लागत होता. यावर उपाय म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीने मागील दोन वर्षांपासून हळद खरेदीला सुरुवात केली.
आठवड्यात फक्त शनिवारी हळद खरेदी केल्या जातो. यामुळे शनिवारपासून जिल्हाभरातून तब्बल ४ हजार क्किंटल हळद बाजार समितीत आली होती. त्यानंतर तीन दिवसांपासून हळदीचा काटा केल्या जात असल्याने सोमवार २४ एप्रिल रोजी इतर मालाची खरेदी बंद ठेवण्यात आली आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हळद विक्रीसाठी बाजारपेठ असावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन वर्षांपासून हळद खरेदीला सुरुवात केली. त्यासाठी आठवड्यातील शनिवार दिवस निश्चित करण्यात आला आहे. यंदा जिल्ह्यात हळदीचे उत्पादन चांगले झाल्याने बाजारात आवक वाढली. शनिवार २२ एप्रिल रोजी आलेल्या मालाची मोजणी करण्यासाठी २३ एप्रिल रोजी रविवार असतानाही मोजणी केल्या गेली. त्यानंतरही हळदीची मोजणी होऊ शकली नसल्याने मोजणीसाठी इतर वाणाची खरेदी थांबविण्यात आली, ४ हजार क्विंटल हळद खरेदी लक्षात घेत व्यापाऱ्यांनी सोमवारी इतर शेतमालाची खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
शनिवार, रविवार व सोमवार सतत तिन दिवस खरेदी केलेल्या हळदीची मोजणी केल्या जात असून बाजार समितीत हळदीला प्रति क्किंटल ५८०० एवढा दर देण्यात आला. त्यामुळे जिल्हाभरातील हळद उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केल्या जात आहे.