‘लॉकडाऊन’मध्ये टरबूज, खरबूज, संत्र्याची विक्रमी विक्री; चार कोटींवर उलाढाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 05:51 PM2020-05-09T17:51:54+5:302020-05-09T17:51:59+5:30
शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या अभिनव उपक्रमातून झालेल्या शेतमाल विक्रीतून ९ मे पर्यंत ४ कोटींवर उलाढाल झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणूच्या पृष्ठभुमीवर सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’ला ९ मे रोजी ४६ दिवस पूर्ण झाले. यादरम्यान शेतकºयांनी पपई, टरबूज, खरबूज, संत्रा या फळपिकांची व्यापाºयांमार्फत विक्री न करता स्वत:च बाजारात बसून विक्री केली. विशेष म्हणजे अकोला येथील ‘कोल्ड स्टोरेज’मध्ये ठेवलेला मुंगळा (ता.मालेगाव) येथील संत्र्याला वाशिममध्ये चांगला दर मिळाला. यामाध्यमातून ९ मे पर्यंत ४ कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाली.
वाशिम जिल्ह्यातील मुंगळा हे सर्वाधिक संत्रा आणि टरबूज पिकविणाºया शेतकºयांचे गाव म्हणून ओळखले जाते. यासह वारंगी, करंजी, डही, शिरपूर, घाटा मिर्झापूर, मेडशी या गावांमधील शेतकरीही पपई, संत्रा, टरबूज, खरबूज यासह भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन घेतात.
दरम्यान, फळपिकांची दरवर्षी व्यापाºयांना थेट विक्री केली जाते. मिळेल तो दर घेऊन समाधान मानावे लागते. यंदा मात्र ‘लॉकडाऊन’मुळे परजिल्ह्यातून व्यापाºयांनी शेतकºयांचा शेतमाल घेण्याबाबत उदासिनता दर्शविली. यामुळे अखेर शेतकºयांनी स्वत:च आपला माल वाशिमच्या बाजारात विक्रीस उपलब्ध केला. कृषी विभागाचे त्यास अपेक्षित सहकार्य लाभल्याने शेतकºयांचा चांगला फायदा झाला. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या अभिनव उपक्रमातून झालेल्या शेतमाल विक्रीतून ९ मे पर्यंत ४ कोटींवर उलाढाल झाली.