आशा वर्कर्सकडुन दहा लाखावर वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:47 AM2021-08-13T04:47:10+5:302021-08-13T04:47:10+5:30
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका जिल्हाभरात कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांना आरोग्य संदर्भात जनजागृती करणे. कुटूंब कल्याण योजनेचा प्रचार ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका जिल्हाभरात कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांना आरोग्य संदर्भात जनजागृती करणे. कुटूंब कल्याण योजनेचा प्रचार करणे, प्रसुतीपुर्वी तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या देणे अशा प्रकारे माता बालआरोग्यविषयी प्रबोधन करणे. लसीकरण केंद्रावर मदतीचे काम करणे. जन्म आणी मृत्यू नोंदणीमध्ये मदत करणे. किरकोळ आजारांवर औषध देणे अशा जबाबदाºया आशा स्वयंसेविका पार पाडत असतात.
या जबाबदाºया पार पाडत असताना त्यांनी केलेल्या कामाचा अहवाल विशिष्ट नमुना असलेल्या रजिस्टर मध्ये नोंदी करून वरिष्ठांना सादर करावा लागतो. आश स्वयंसेविकांना कामाच्या नोंदी करण्यासाठी आरोग्य विभागाकडुन मोफत रजिस्टर पुरविल्या जाते. हे सर्वश्रुत आहे. तथापी आरोग्य विभागातील काही महाभागांनी (उच्चपदस्थ समुह संघटक)नोंदीच्या रजिस्टरसाठी प्रत्येक तालुकास्तरावरील समुह संघटकाला आशा स्वयंसेविकेकडुन प्रत्येकी १२०० रूपये जमा करण्याचे आदेश फर्मावले. हे महाशय एवढ्यावरच न थांबता या विषयाची कुणाकडुन वाच्यता झाल्यास आशाचा अकरा महिण्याचा करार संपल्यानंतर पुन्हा सेवेत घेणार नाही. असेही धमकीवजा निरोप पाठविले. या धमकीला घाबरत आशा स्वयंसेविकांनी साहेबांच्या म्हणण्यानुसार गट प्रवर्तकाकडे रक्कम जमा केली. गट प्रवर्तकाने ही रक्कम तालुका समुह संघटकाकडे दिली. या गैरव्यवहाराची थातुरमातुर चौकशी करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकाºयांनी चौकशी अहवाल वरिष्ठांकडे सादर केले. परंतु वरिष्ठांनी हे प्रकरण मॅनेज करून थंडबस्त्यात ठेवल्याची माहिती आहे.
----------
‘ती’ ऑडिओ क्लीप व्हायरल
उच्चपदस्थ समुह संघटकाचे एका गटप्रवर्तकासोबत झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लीप चांगलीच व्हायरल होत आहे. यामध्ये तो एका गटप्रवर्तकास रजिस्टरचे १२०० रूपये जमा करून मला पाठवा असा आदेश देत आहे.
आशाकडुन वसुली केल्याचे पत्र ‘लोकमतकडे’
वाशिम तालुक्यातील आशा स्वयंसेविकेकडुन रजिस्टरच्या नावाखाली प्रत्येकी १२०० रूपये जमा केले. जमा केलेली रक्कम वरिष्ठांच्या नावासह त्यांचेकडे केल्याचा लेखी जबाब वाशिम तालुक्यातील गट प्रवर्तकांनी तालुका आरोग्य अधिकाºयांकडे दिला आहे. अशा स्वरूपाचे अनेक पत्र लोकमतच्या हाती लागले आहेत.
कार्यवाही थंडबस्त्यात का?
गट प्रवर्तकांनी आशा स्वयंसेवीकेकडुन जमा केलेली रक्कम एका वरिष्ठ समुह संघटकाकडे जमा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. असे असतानाही त्या महाशयावर अद्यापही कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. किंबहुंनी यामध्ये आपलाही खिसा भरून घेतल्याची माहिती आहे.