अवैध गौण खनिज वाहतूकप्रकरणी दोन लाख रुपयांचा दंड वसूल
By admin | Published: June 5, 2017 02:20 AM2017-06-05T02:20:54+5:302017-06-05T02:20:54+5:30
तहसीलदारांनी ३ जून रोजी सात वाहनधारकांकडून २ लाख १५ हजार ६00 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : अवैध गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी येथील तहसीलदारांनी ३ जून रोजी सात वाहनधारकांकडून २ लाख १५ हजार ६00 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, ट्रकची तपासणी केली असता सात ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाळूची वाहतूक करताना आढळल्याची माहिती तहसीलदार सुनील चव्हाण यांनी दिली. त्यानुसार, संबंधित वाहनधारकांकडून प्रत्येकी ३0 हजार ८00 रुपये याप्रमाणे २ लाख १५ हजार ६00 रुपये दंड वसूल करून, तो शासन तिजोरीत जमा करण्यात आला. या कारवाईत तहसीलदारांव्यतिरिक्त कनिष्ठ लिपिक संदीप आडे, घुगे, तलाठी अरुण राठोड यांनी सहभाग नोंदविला.