वाशिम जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक शौचालयांचे लक्ष्य असलेल्या ९४ ग्रामपंचायतींना रेड अलर्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 07:01 PM2017-12-18T19:01:03+5:302017-12-18T19:03:22+5:30
वाशिम: जिल्हा हगणदरीमुक्त होण्यास अडसर ठरणाºया २४७ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना जि. प. अध्यक्ष हर्षदा देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी पत्र पाठवून शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
वाशिम: जिल्हा हगणदरीमुक्त होण्यास अडसर ठरणाºया २४७ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना जि. प. अध्यक्ष हर्षदा देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी पत्र पाठवून शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. २०० पेक्षा अधिक शोचालय बांधकामांचे उद्दीष्ट बाकी असलेल्या ९४ सरपंचांना लाल सहिचे पत्र पाठवून कलम ३९ अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सन २००० पासून जिल्ह्यातील प्रत्येक घरामध्ये शौचालयाचे बांधकाम करुन त्याचा वापर करण्याचा कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. ९ आॅगस्ट २०१५ पासून संपूर्ण स्वच्छतेची आॅगस्ट क्रांती हे अभियान सुरु करुन कार्यक्रमास गती देण्यात आली. गेल्या दोन वर्षामध्ये जिल्ह्यात जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले. त्यात महीला मेळावे, गृहभेटी, रॅली, एलईडी व्हॅन, याव्दारे तसेच कलावंतांमार्फत जनजागरण प्रभात फेºयांमुळे वैयक्तीक शौचालय बांधकामाची व वापराची आवश्यकता याचे महत्व जनतेला पटवुन देण्यात आलेले आहे. परिणामी, जिल्हयामध्ये एकुण २४४ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाला असून जिल्ह्यातील वैयक्तीक शौचालयांची संख्या ७६ टक्के इतकी झालेली आहे. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी विशेष योगदान दिल्यामुळे जिल्हा हगणदरीमुक्तीकडे वाटचाल करीत आहे.
असे असताना २४७ ग्रा. पं. मध्ये या दोन वर्षात शौचालय कामाची प्रगती मंदावली असून यास गती मिळण्याकरिता सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षांनी गृहभेटी देवून ग्रामस्थांना प्रेरीत करण्याचे आवाहन करण्यात आले. बाकी राहिलेल्या कामाचे दररोजचे, हप्त्याचे व महिन्याचे नियोजन करण्याच्या सुचना ग्रामपंचायतींना पाठविलेल्या पत्राव्दारे देण्यात आल्या आहेत.
...तर सरपंचांवर कलम ३९ अंतर्गत कारवाई!
विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गाव हगणदरीमुक्त करुन दिलेल्या उद्दिष्टानुसार काम न करणाºया ग्रामपंचायतींवर कलम ३९ अन्वये कारवाई करण्याचा सुचना दिलेल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात या कार्यक्रमामध्ये सहभागी होवुन वैधानिक जबाबदारी पार पाडण्यात कसुर करणाºया ग्रामपंचायतींवर कलम ३९ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कळविले आहे.