वाशिममध्ये हळद खरेदी प्रक्रिया पूर्ववत

By admin | Published: July 16, 2017 02:13 AM2017-07-16T02:13:27+5:302017-07-16T02:13:27+5:30

८३00 रुपये प्रतिक्विंटलचा दर; पहिल्या दिवशी ५00 क्विंटलची आवक.

Reddish turmeric purchase process in Washim | वाशिममध्ये हळद खरेदी प्रक्रिया पूर्ववत

वाशिममध्ये हळद खरेदी प्रक्रिया पूर्ववत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या हळद खरेदी प्रक्रियेस स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवार, १५ जुलैपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी ५00 क्विंटल हळदीची आवक झाली. त्यास ८३00 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
वाशिम बाजार समितीने नेमलेल्या दिवशी म्हणजेच शनिवारी हळद उत्पादक शेतकरी मोठय़ा प्रमाणात आपला माल विक्रीसाठी आणत होते. मात्र, १ जुलैपासून हळद खरेदी बंद करण्यात आली होती. ती पुन्हा सुरू व्हावी, यासाठी शेतकर्‍यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन केले जाईल, अशी भूमिका शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख माणिक देशमुख, तालुका प्रमुख रामदास मते पाटील, शहर प्रमुख गजानन भादुंर्गे, उपशहर प्रमुख दिलीप काष्टे यांनी घेतली होती.
दरम्यान, शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेवून बाजार समितीचे विद्यमान संचालक राजू चौधरी, सुरेश मापारी, हिराभाई जानीवाले, विनोद पट्टेबहादूर, बापूराव उगले, आनंद चरखा यांनी अडते, व्यापारी, हमाल यांच्यासोबत चर्चा करून हळद खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी यशस्वी पुढाकार घेतला. त्यामुळे १५ जुलैपासून हळद खरेदी पुन्हा सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी ८३00 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

हळद उत्पादकांनी व कास्तकारांनी हळद विक्रीसाठी दर शनिवारी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणावी. आजच्या खरेदीत ७00 क्विंटल आवक झाली असून, ७५00 ते ८३00 रुपये क्विंटल प्रमाणे त्यांना भाव मिळाला आहे.
- बबनराव इंगळे
सचिव, कृउबास, वाशिम

Web Title: Reddish turmeric purchase process in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.