कापडासह रेडिमेड बाजार तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 08:00 PM2017-09-29T20:00:20+5:302017-09-29T20:02:31+5:30

वाशिम : नोटाबंदी, जि.एस.टी. व अत्यल्प पाऊस या कारणामुळे मागील काही महिन्यांपासून मंदीच्या सावटाखाली संपूर्ण बाजारात शुक शुकाट असतांना सुध्दा घटस्थापना , नवरात्री, दसरा, व दिवाळीनिमित्त व्यावसायीक सज्ज झाले असुन ग्राहकांच्या वाढत्या गर्दीची चाहुल पाहता कापड व रेडीमेड व्यवसाय तेजीत असल्याचे दिसुन येत आहे.

The redeemed market with textiles is fast | कापडासह रेडिमेड बाजार तेजीत

कापडासह रेडिमेड बाजार तेजीत

Next
ठळक मुद्देनविन पॅटर्नची रेलचेल दुकाने हाऊसफूल्ल

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नोटाबंदी, जि.एस.टी. व अत्यल्प पाऊस या कारणामुळे मागील काही महिन्यांपासून मंदीच्या सावटाखाली संपूर्ण बाजारात शुक शुकाट असतांना सुध्दा घटस्थापना , नवरात्री, दसरा, व दिवाळीनिमित्त व्यावसायीक सज्ज झाले असुन ग्राहकांच्या वाढत्या गर्दीची चाहुल पाहता कापड व रेडीमेड व्यवसाय तेजीत असल्याचे दिसुन येत आहे. संपूर्ण विदर्भात व विशेष करुन पश्चिम विदर्भात अत्यंत कमी पाऊस पडल्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत मंदीची लाट आलेली आहे. नोटाबंदी व जिएसटी यामुळे व्यापारी बंधु , शेतकरी, व तमाम जनता आर्थिक संकटात आहे.  परिणामी बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी रुढावली असुन जेमतेज शेतीचे पिक हातात येण्याची अपेक्षा बाळगुन रेडीमेड व कापड व्यावसायीकांनी राज्यातुन तसेच परराज्यातुन आकर्षक डीझाईन व नवनवीन पॅटर्नचे सुंदर रेडीमेड कापड  तसेच सुटींग शर्टींग साड्या, ड्रेस मटेरीयल, इत्यादीचा  बंपर स्टॉक आपल्या प्रतिष्ठाणामध्ये आगाऊ बोलावुन ठेवण्याचे धाडस व होलसेल व किरकोळ कापड विक्रेत्यांनी केल आहे. दसरा दिवाळी शेतमालाचा रोख पैसा हाती येणार  यामुळे शेतकरी बांधवांसोबतच नोकरी पेशात सेवारत असलेल्या ग्राहकाकडून  येत्या पंधरवाड्यात चांगली व मोठ्या प्रमाणात रेडीमेड वस्त्रांची व कापडाची खरेदी होईल  अशी आशा व्यावसायीक बंधु बाळगुन आहेत. लहान मुलांपासून युवक यवुती तसेच प्रौढ नागरिकांना डोळ्यासमोर ठेवुन व्यावसायीकांनी उत्तम दर्जाचे नवनवीन सुंदर डीझाईन व आकर्षक पॅटर्नचे रेडीमेड कापडाचा  जंगी साठा ग्राहकांसाठी व्यावसायीकांनी उपलब्ध केला आहे. दसरा ,दिवाळीत, लाखो रुपयाची उलाढाल  ठोक व किरकोळ कापड विक्रेता करीत असल्याचे  विके्रत्यांनी लोकमतला सांगितले. शहरातील कापड व रेडीमेड शोरुमचे संचालक द रेमंड शॉप, फॅशन पार्क, मनोज कापड, रघुनाथ प्रतापमल बज, विजय क्लाथ स्टोर्स, गणेश क्लाथ स्टोर्स, सुविधा कापड केंद्र, पारिजात क्लाथ  व रेडीमेड, श्री क्लाथ स्टोअर्स,  श्रीराम क्लाथ स्टोर्स, बदलानी बाजार, पाटील कापड, भावसार रेडीमेड, डिगांबर डेसेस,राठी साडी, मेघा साडी सेंंटर, नम्रता गारमेंट, नारायणी साडी कलेक्शन, सौजन्य क्लाथ स्टोर्स, चरखा रेडीमेड, सोमाणी रेडीमेड, दागडीया रेडीमेड, गट्टानी साडीज, सहेली लेडीज कलेक्शन,  साची  लेडीज कलेक्शन, सलोनी लेडीज कलेक्शन, इत्यादीसह शहरातील व जिल्ह्यातील कापड रेडीमेड बाजारपेठेत सुंदर व आकर्षक डिझाईनच्या व नवीन व्हेराटीजचा माल ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे.

पावसाने दडी मारली त्यामुळे शेतीचे उत्पादनही अत्यल्प होणार असल्याचे चित्र असले तरी शेतमालाचा हाती येणारा पैसा व नोकरदार यांच्या भरोश्यावर नवीन मालाचा जंगी स्टॉक ग्राहकासाठी  उपलब्ध केला आहे. दसरा, दिवाळी सर्वात मोठे सण असल्याने बाजारपेठ फुलली आहे. ग्राहकांच्या गर्दीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
- पदमकुमार राउत, व्यावसायिक

Web Title: The redeemed market with textiles is fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.