दाढी कटिंग दरामध्ये कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:42 AM2021-02-24T04:42:13+5:302021-02-24T04:42:13+5:30
शिरपूर येथील सलून व्यावसायिकांनी लॉकडाऊनच्या काळात दाढी व कटिंगचे दर वाढविले होते. पूर्वी २० रुपये दाढी ३० ते ४० ...
शिरपूर येथील सलून व्यावसायिकांनी लॉकडाऊनच्या काळात दाढी व कटिंगचे दर वाढविले होते. पूर्वी २० रुपये दाढी ३० ते ४० रुपये कटिंगचे दर आकारले जात होते. ऑगस्ट २०२० पासून दाढी ३० ते ५० रुपये तर कटिंगचे ५० ते ८० रुपये दर आकारले जाऊ लागले. शिरपूरसारख्या ग्रामीण भागात हे दर ग्राहकांनाही अधिक वाटू लागले. परिणामतः बहुतांश जणांनी दाढी घरी करणे सुरू केले होते. त्यातच शिरपूरसारख्या ग्रामीण भागामध्ये मोबाइल, टीव्ही रिचार्ज, इलेक्ट्रिक बिल भरणेसह नियमित दाढी करण्याचा खर्च झेपावणे आवश्यक त्या प्रमाणात रोजगार नसल्याने लोकांना अवघड झाले. हे लक्षात घेऊन काही सलून व्यावसायिकांनी दाढी-कटींगच्या भावामध्ये कपात केली आहे. ३० ते ५० रुपये दर असलेल्या दाढीचे आता ३० रुपये तर ५० ते ८० रुपये दर असलेल्या कटिंगचे ४० रुपये दर आकारण्यात येत आहेत.
येथील रोजगार क्षमता लक्षात घेऊन दाढी-कटिंगचे दर कमी करण्यात आले आहेत. आम्ही अधिक काम करून जास्त रोजगार मिळवू.
नटू पवार सलून व्यावसायिक शिरपूर.