खरेदीच्या मुहूर्तावरच कापूस मोजून घेण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 05:33 PM2020-11-29T17:33:36+5:302020-11-29T17:33:55+5:30
Cotton Purchase News कापूस खराब असल्याचे कारण पुढे करून कापूस मोजुन घेण्यास नकार दिला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : पणन महासंघाच्यावतीने २७ नोव्हेंबर रोजी कारंजा येथील तिरूमला जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीत कापसाची हमी दरात शासकिय खरेदी सुरू झाली. खरेदीच्या मुहूर्तावरच कापूस मोजून घेण्यास नकार दिल्याची तक्रार राजेंद्र ठाकरे यांनी केली. या तक्रारीनुसार २८ नोव्हेेंबर रोजी चौकशी करण्यात आली.
कारंजा तालुक्यातील यावार्डी येथील शेतकरी राजेंद्र मोतीराम ठाकरे यांच्या कापसाचे ग्रेडिंग करून काही कापूस मोजण्यात आला. परंतु त्यानंतर कापूस घेण्यास जिनिंग प्रेसिंग प्रशासनाने नकार दिल्याने कापूस तसाच पडून आहे. तक्रारीनुसार ठाकरे यांचे यावार्डी शेतशिवारात सर्व्हे नंबर ९५/१ मध्ये सहा हेक्टर शेतजमिन असून या शेतात त्यांनी कपाशीची लागवड केली. पणन महासंघाच्या आदेशानुसार हमीभावात कापसाची विक्री करण्याकरीता ठाकरे यांनी आॅनलाईन नोंदणी केली. त्यानुसार त्यांना कापूस मोजणीसाठी बाजार समितीच्या वतीने संदेश पाठविण्यात आला. खरेदी केंद्रावर एका वाहनात जवळपास २५ ते ३० क्विंटल कापूस विक्रीसाठी आणला. त्यानंतर संबंधित ग्रेडरने ग्रेडिंग केल्यानंतर बाजार समितीच्यावतीने ठाकरे यांचा सत्कार करून त्यांचा कापूस मोजण्याची प्रक्रिया सुरू झाली. परंतु काही वेळाने जिनिंग प्रेसिंग मालक आले व त्यांनी कापूस खराब असल्याचे कारण पुढे करून कापूस मोजुन घेण्यास नकार दिला. याप्रकरणी ठाकरे यांनी संबंधितांकडे तक्रार केली. त्या अनुषंगाने २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता सहायक निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऽयांच्या उपस्थितीत पंचनामा करून या शेतकऽयास कापूस परत नेण्यास भाग पाडले. खरेदीच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार घडल्याने शेतकºयांमधून संताप व्यक्त होत आहे.