जीर्ण ईमारतीबाबत न.प. ने लक्ष देणे गरजेचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:15 AM2021-08-02T04:15:17+5:302021-08-02T04:15:17+5:30
वाशिम शहरातील जुन्या वस्तींमध्ये माेठया प्रमाणात जुन्या ईमारती असून त्या जीर्ण झाल्या आहेत. यामुळे केव्हाही अपघाताची शक्यता नाकारता येत ...
वाशिम शहरातील जुन्या वस्तींमध्ये माेठया प्रमाणात जुन्या ईमारती असून त्या जीर्ण झाल्या आहेत. यामुळे केव्हाही अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे नगरपरिषेने लक्ष देऊन ईमारतींची दुरुस्ती किंवा त्या पाडण्याबाबत कार्यवाही करणे गरजेचे आहे. काही दिवसांआधी शहरातील एक जीर्ण ईमारत पडली पण त्यामध्ये काेणी जखमी झाले नाही. परंतु काही जीर्ण ईमारतीमध्ये नागरिक वास्तव्यास असल्याने अनर्थ घडू शकताे. काही नागरिकांचे घरकूलही मंजूर झाल्याची माहिती आहे, परंतु काही अडचणींमुळे ते रखडल्याने जीव मुठीत घेऊन नागरिकांना जीर्ण ईमारतीत वास्तव्य करावे लागत आहे. नगरपरिषदेतर्फे जीर्ण ईमारत मालकांना नाेटिसा बजावण्याशिवाय काेणतेच पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे नगरपरिषदेने पुढाकार घेऊन शहरातील जीर्ण ईमारतीबाबत काही तरी निर्णय घेऊन नागरिकांचा धाेक्यात असलेला जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- नीलेश चव्हाण, स्वामी समर्थ नगर, वाशिम