जिल्ह्याबाहेरील २५ बाधितांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:07 AM2021-05-05T05:07:05+5:302021-05-05T05:07:05+5:30
००००००० किन्हीराजा येथे आणखी २ रुग्ण वाशिम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे आणखी २ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ३ ...
०००००००
किन्हीराजा येथे आणखी २ रुग्ण
वाशिम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे आणखी २ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ३ मे रोजी पॉझिटिव्ह आला. यापूर्वीदेखील किन्हीराजा येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
००००
कोरोना उपाययोजनांचा आढावा
वाशिम: जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांना वेग देण्यासाठी सोमवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी आरोग्य विभागाची आढावा बैठक होऊन चर्चा केली.
००
शिरपूर येथे आणखी दोन बाधित
वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील आणखी दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल ३ मे रोजी पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. शिरपूर परिसरात दररोज रुग्ण आढळून येत आहेत.
००००
वाहनांतून प्रदूषण; कारवाईची मागणी
वाशिम : बहुतांश जीप, ऑटो, दुचाकी वाहने जुनी झाली असून ही वाहने सर्रास रस्त्यावरून धावत असल्याने प्रदूषण होत आहे. संबंधित यंत्रणेने त्यावर निर्बंध लादून प्रदूषणाची समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.
०००००००
पोलीस स्टेशन चौकात दुभाजकाची गरज
वाशिम : संभाव्य अपघात टाळण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन चौक परिसरात रस्ता दुभाजक टाकण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. यासंदर्भात बांधकाम विभागाला सोमवारी नागरिकांनी निवेदनही दिले.
००
नुकसानभरपाई प्रतीक्षा कायम
वाशिम : शिरपूर गाव परिसरात १९ ते २१ मार्चदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे विशेषत: कांदा, फळपिके व भाजीपालावर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानभरपाई अद्याप मिळाली नाही.
०००
रोजगार सेवकांचे मानधन प्रलंबित
वाशिम : गत दोन महिन्यांपासून मानधन प्रलंबित असल्याने वाशिम तालुक्यातील रोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रलंबित मानधन तातडीने देण्याची मागणी रोजगार सेवक संघटनेने पंचायत समिती प्रशासनाकडे केली.
00000000000000000
घरकुल बांधकामाबाबत जनजागृती
वाशिम : अपूर्ण घरकुलाचे बांधकाम पूर्ण करणे, घरकुलासाठी सरकारी जागा उपलब्ध करून देणे, अतिक्रमित जागा नियमानुकूल करणे आदीबाबत ऑनलाईन पद्धतीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने पंचायत समितीमार्फत लाभार्थींना मार्गदर्शन करीत जनजागृती केली.
000000000000000000000
बँकांसमोर नागरिकांची गर्दी कायम
वाशिम : खरीप हंगामाकरिता खते, बियाणे खरेदी करण्यासाठी पीक कर्ज घेण्याकरिता शेतकऱ्यांची बँकांसमोर गर्दी होत आहे. सोमवारी मानोरा येथील बँकांसमोर शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन बँक प्रशासनाने केले.
०००००००००००
एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट
वाशिम : शहरातील बहुतांश एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट असल्याने सोमवारी सकाळी १० वाजतादरम्यान अनेकांची पंचाईत झाली. बँकांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून शहरातील सर्व एटीएमध्ये पुरेशा प्रमाणात पैसे ठेवण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी सोमवारी केली.
०००००००